शमिता शेट्टीचा फॉलोअर्सना अनफॉलो करण्याचा सल्ला!

मंगळवार, 19 जून 2018

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी हिलाही अशाच ट्रोलला आता उत्तर देण्याची वेळ आली आणि तिने ते उत्तर दिलंही.  

‘फादर्स डे’च्या निमित्ताने शमिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शिल्पा आणि ती वडिलांच्या प्रतिमेवर फुलं अर्पण करताना दिसत आहेत. याच व्हिडिओवर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स दिल्या. हसत हसत प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण करताना पाहून अनेकांनी शिल्पा आणि शमितावर टिकेचा भडीमार केला. तर या टीकांना जशास तसं उत्तर शमिताने दिलं. 

सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल होण्याला सामोरे जावं लागणे काही नवीन नाही. एखादी पोस्ट वा फोटोवरून त्यांच्यावर टीका होते आणि बऱ्याचदा सेलिब्रिटी या ट्रोलिंगला प्रत्युत्तरही देतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी हिलाही अशाच ट्रोलला आता उत्तर देण्याची वेळ आली आणि तिने ते उत्तर दिलंही.  

टीका करणाऱ्या युजर्सना 'मला अनफॉलो करा' असाच थेट सल्ला तिने दिला आहे. ‘मी नकारात्मक प्रतिक्रियांकडे फारसं लक्ष देत नाही. पण तुम्ही ट्रोलसाठी चुकीचा दिवस निवडला आहे. जी मुलगी आपल्या पित्याची पूजा करतेय, तिच्याबद्दल तुम्ही अशा प्रतिक्रिया देत आहात. अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांना स्वत:चे फॉलोअर्स म्हणताना मला लाज वाटते. मला लगेच अनफॉलो करा आणि तुमचा वेळ एखाद्या सकारात्मक गोष्टींत घालवा,’ अशा शब्दांत शमिताने ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं. मला फॉलो करण्यासाठी मी कोणलाही बळजबरी केली नाही, असंही ती म्हणाली. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.