
Shanti Priya : 'सावळी म्हणून डावललं!' तब्बल २८ वर्षानंतर मिळाली संधी
Shanti Priya Bollywood Actress skin color controversy : भारत कोकिला या नावाची एक बायोपिक येत्या काही दिवसानंतर प्रेक्षकांसमोर येणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जेव्हा त्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा त्यामध्ये कोण काम करणार याविषयी चर्चा रंगली. आता त्यावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
त्या चित्रपटामध्ये कोणती स्टारकास्ट असणार याविषयी कोणताही खुलासा कऱण्यात आलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण सरोजिनी नायडूच्या भूमिकेत सोनल मोंटेरो दिसणार आहे. तर ज्येष्ठ सरोजिनीच्या भूमिकेत शांती प्रिया असणार आहे. त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात केली आहे.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
शांती प्रिया ही अशी अभिनेत्री आहे जिला बॉलीवूडमध्ये स्वताची ओळख प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. ती सगळ्यात पहिल्यांदा अक्षय कुमार सोबत सौगंध या चित्रपटामध्ये दिसली होती. त्यातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं. आजही शांती प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता एक दोन नव्हे तर २८ वर्षानंतर शांती प्रिया ही बॉलीवूडमधील एका चित्रपटाच्या निमित्तानं समोर येणार आहे.
बॉलीवूडमध्ये रंगभेद हा काही नवीन नाही. त्याचा अनेक सेलिब्रेटींना मोठा सामना करावा लागला होता. काही अभिनेत्रींना त्यामुळे त्यांच्या करिअरला रामराम करावा लागला होता. यात बऱ्याचशा दिग्गज अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. शांती प्रिया देखील त्यापैकी एक. आपल्याला नेहमीच रंगावरुन हिणवण्यात आले होते. सध्या शांती प्रियाचे वय हे ५३ वर्षांचे आहे. तिचा पहिलाच पॅन इंडिया नावाचा प्रोजेक्ट आहे. ती फिल्म हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शांती प्रियावर काही वर्षांपूर्वी आलेला तो प्रसंग अजुनही विसरलेली नाही. तिला तेव्हा काम मिळणं बंद झालं होतं यानंतर शांती प्रियाला मोठा लढा द्यावा लागला होता. तिला बऱ्याच वर्षांनी पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याची संधी मिळाली होती. त्यावर शांती प्रियाचे म्हणणे होते की, मला माझ्या रंगावरुन हिणवण्यात आले होते. तू तर सावळ्या रंगाची आहेस त्यामुळे तुला काम मिळणे कठीण आहे. असे अनेकांचे म्हणणे होते.