कलाकारांनी विमा करावा यासाठी पोंक्षे यांची भावनिक साद

टीम ई सकाळ
गुरुवार, 13 जुलै 2017

मरण सांगून येत नाही. शूटिंग करता करता अपघात सांगून होत नाही. अशा स्थितीला आपण कायम तयार रहायला हवे. म्हणूनच कलाकारांनी तातडीने विमा उतरवून घ्यायला हवा. हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. 

मुंबई: मरण सांगून येत नाही. शूटिंग करता करता अपघात सांगून होत नाही. अशा स्थितीला आपण कायम तयार रहायला हवे. म्हणूनच कलाकारांनी तातडीने विमा उतरवून घ्यायला हवा. हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. 

त्यांनी पाठवलेला मेसेज असा, 

नमस्कार कलावंतानो,
आपला एक नाट्य कलाकार संघ आहे.जो नाट्यपरीषदेच्या अंतर्गत आहे.गेली ३ वर्ष अध्यक्ष प्रदिपजी कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे काम ऊत्तम चालु आहे.१०० कलावंतांचा ईंश्युरंस आम्ही उतरवला.वर्षातुन एकदा जागतीक कलाकार दिन साजरा केला जातो.तर हे सर्व करायला निधीची आवश्यकता भासते.तेव्हा ५०० कलावंतांनी दरवर्षी रु.१०००/-,कलाकार दिनासाठी वर्गणी व दरवर्षी  रु १००० कलाकार निधी म्हणुन दिलेत.तर साधारण ५ -५ लाख रुपये जमा होतात.त्यातुन अनेक कलावंतांच्या गरजा. आर्थिक समस्या सोडवण सोप्प जाईल.कोणाकडे हात पसरण्याची गरजच नाही.बर वर्षाला २ हजार आपल्याला जड नाहीत.पण तोच पैसा अडचणीत मात्र उपयोगी येतो.कृपया.
"नाट्य कलाकार संघ."
ह्या नावाने दरवर्षी रु १००० चे दोन चेक आपण द्यावेत ही नम्र विनंती.
""# वेळ प्रसंग कोणावर कधीही येऊ शकतो.#""
हे विसरु नका.आम्हाला कळवलत की लगेच आमचा एक माणुस तुम्ही म्हणाल तिथे येईल.फक्त धनादेश देण्याची तसदी घ्या.
धन्यवाद.
शरद पोंक्षे,उपाध्यक्ष.कलाकार संघ.
 

Web Title: sharad ponkshe esakal news