Sharad Ponkshe: हिंदू हा एकच धर्म; बाकी सगळे... इतर धर्मांवर शरद पोंक्षे आज स्पष्टच बोलले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad ponkshe said hindu is only one religion and another religion is just trust and Institution

Sharad Ponkshe: हिंदू हा एकच धर्म; बाकी सगळे... इतर धर्मांवर शरद पोंक्षे आज स्पष्टच बोलले..

Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे म्हणजे कडाडती तोफ. उत्तम अभिनय आणि तितकीच शब्दावर आणि भाषेवर पकड. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे पर्वणीच असते. आपल्या हिंदुत्ववादी विचारांनी ते प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना भारावून टाकतात.

अभिनेते शरद पोंक्षे हे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे.. कधी व्याख्याना,मुळे तर कधी सोशल मिडियावरील पोस्ट मुळे.. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.

ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ते ठिकठिकाणी व्याखान देत असतात. असाच त्यांच्या व्याख्यानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरळ होत आहे.

(sharad ponkshe said hindu is only one religion and another religion is just trust and Institution)

शरद पोंक्षे यांनी नुकतेच मुंबईतील विले पार्ले येथे व्याख्यान दिले. या व्याख्यानातील एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी अत्यंत मोठं विधान केलं आहे. जगामध्ये हिंदू हा केवळ एकच धर्म असल्याचे ते म्हणाले, शिवाय इतर धर्मांविषयी ही त्यांनी महत्वाचे विधान केलले ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पोंक्षे या व्हिडिओ मध्ये म्हणतात की, ''लोकांच्या गरजा काय होत्या, त्यांना काय हवं होतं या सगळ्याचा विचार करून एक प्रेषित, एक संस्था, एक नेतां एक महात्मा नेमला गेला आणि त्यांनी त्या अमुक एका संघटनेची स्थापन केली. म्हणून त्यांच्या धर्माचे संस्थापक आहे, एक महात्मा आहे, धर्म संस्थेच्या स्थापना एक तारीख एक तिथी आहे.''

''जसं की या एका तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, शिवसेनेची स्थापना झाली, तसं इस्लाम धर्माची स्थापना झाली, ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. त्यामुळे त्या धर्म संस्था आहेत धर्म नाही. पण एकच असा धर्म आहे जो सृष्टीच्या निर्मिती पासून आहे तो म्हणजे माणुसकी.. आणि त्याचच नाव हिंदू धर्म आहे.. सगळ्यात प्राचीन, सर्वात सनातन असा एकमेव हिंदू धर्म.. '' अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.

शरद पोंक्षे यांचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. ते सातत्याने हिंदू धर्माविषयी बोलत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टीका देखील होते. पण ते ही त्यावर सडेतोड उत्तर देत आपले सावरकरांचे काम आणि हिंदू धर्म यांचे विचार पोहोचवण्याचे काम अविरत करत आहेत.