
Sharad Ponkshe: हिंदूत्वाचे विचार पोचवणं हेच राष्ट्रकार्य.. शरद पोंक्षे स्पष्टच बोलले
Sharad Ponkshe: 'हिंदुत्व' आणि शरद पोंक्षे यांचे एक वेगळेच नाते आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एक दमदार आणि कसलेला अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. ते अभिनया पलीकडे आपल्या व्याख्यानातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व असेच त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ असतात. ते आपल्या भाषणातून हिंदुत्वाच्या प्रसाद- प्रचाराचे काम करत असतात. अशाच एका भाषणातील एक व्हिडिओ त्यांनी शेयर केला आहे.
'बीड' मध्ये झालेले ही भाषण प्रचंड गाजले. श्रोत्यांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी पोंक्षे यांनी हिंदुत्वावर अत्यंत स्पष्ट विधान केले.
(Sharad Ponkshe said spread hinduism and to convey he thoughts of Hinduism is the national task social work )
अभिनेते शरद पोंक्षे यानी बीड येथे झालेल्या भाषणातील एक व्हिडिओ शेयर केला आहे. यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय पोंक्षे यांना ऐकायला आला होता. पोंक्षे यांचे झालेले स्वागत, सत्कार आणि भाषणातील काही भाग पोंक्षे यांनी शेयर केला आहे.
या व्हिडिओला पोंक्षे यांनी एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ''बीड येथे सावरकर विचार ऐकायला प्रचंड गर्दी.गावोगावी हिंदूत्वाचे विचार पोचवणं हेच राष्ट्रकार्य'' असे पोंक्षे म्हणाले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शरद पोंक्षे यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. अभिनया सोबतच हिंदुत्व आणि सावरकर या विषयावर राज्यभरात व्याख्यान देत असतात. त्यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी आहेत.
किंबहुना सावरकर आणि शरद पोंक्षे हे एक समीकरणच आहे. पोंक्षे आपल्या भाषणाने कायमच सर्वांना प्रभावित करत असतात. सध्या त्यांची सावरकर विचार यात्रा अगदी जोरदार सुरू आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यात, गांव खेड्यात जावून ते व्याख्यान देत आहेत.