Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांच्या तडफदार भाषणाने होणार सावरकर गौरव यात्रेचा शेवट.. पोस्ट करत म्हणाले..

शरद पोंक्षे यांच्या पोस्टनं वेधलं सर्वांचच लक्ष..
Sharad Ponkshe shared post savarkar gaurav yantra ends with his speech
Sharad Ponkshe shared post savarkar gaurav yantra ends with his speechsakal

Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. अभिनया सोबतच हिंदुत्व आणि सावरकर या विषयावर राज्यभरात व्याख्यान देत असतात. त्यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी आहेत.

सध्या ते शिवसेना शिंदे गटाचे नेते असून भाजप- सेना सरकारला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांचा भाजपच्या सावरकर गौरव यात्रेला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी या यात्रेत सहभागी होण्याचेही सर्व हिंदूंना आवाहन केले होते.

गेली काही दिवस सुरू असलेली ही यात्रा आज समाप्त होणार आहे. याच निमित्ताने शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेयर करत सर्वांना आवाहन केले आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

(Sharad Ponkshe shared post savarkar gaurav yantra ends with his speech)

Sharad Ponkshe shared post savarkar gaurav yantra ends with his speech
Madhurani Prabhulkar: प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं.. महिलांनो मधुराणीची 'ही' पोस्ट बघाच!

पंतप्रधान मोदींवर त्यांच्या आडनावाचा दाखला देत टीका केली म्हणून सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

त्यानंतर राहुल गांधी यांना माफी मागा असे सांगण्यात आले. पण 'माफी मागायला मी काही सावरकर नाही.. गांधी आहे.. आणि गांधी कधीही झुकत नाही' असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.

यावरून देशभरात बराच कोलाहल सुरू आहे. राहुल गांधी यांचा तीव्र निषेध सुरू आहे. याच संदर्भात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले. ही यात्रा राज्यभरात फिरून आता लातूर येथे समाप्त होणार आहे. या यात्रेचा शेवट शरद पोंक्षे यांच्या भाषणाने होणार आहे. त्याचसंदर्भात एक पोस्ट पोंक्षे यांनी शेयर केली आहे.

पोंक्षे म्हणतात, ''सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांची जाहीर सभा.... स्वा.सावरकर गौरव यात्रा लातूरमध्ये. दि. 08-04-23 रोजी सायंकाळी 5 ला गोलाई लातूर येथून निघणार आहे व 6 ला हनुमान चौक येथे सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांच्या जाहीर सभेने समारोप होणार आहे तरी सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे.'' असे आवाहन त्यांनी केले आहे. या गौरव यात्रेत अभिनेते शरद पोंक्षे यांच्या १०२ वर्षांच्या आजीनेही सहभाग घेतला होता. त्याचीही बरीच चर्चा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com