Sharad Ponkshe: शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, कारण.. शरद पोंक्षेंचे मोठे विधान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Ponkshe shared post on chhatrapati shivaji maharaj jijau masaheb and swarajya

Sharad Ponkshe: शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, कारण.. शरद पोंक्षेंचे मोठे विधान..

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे केवळ अभिनेता नाहीत , एक वक्ता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. सावरकरांच्या विचारांना पोंक्षे पुजतात असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. शरद पोंक्षे यांची भाषणं नेहमीच सावरकरांच्या विचारधारेनं प्रेरित असतात.

त्यांच्या स्वतःच्या युट्युब चॅनेलवरही ते आपली ही भाषणं पोस्ट करतात अन् सोशल मीडियावर ती अनेकदा व्हायरल होतात, बऱ्याचदा तर वादातच सापडतात. नेटकरी अनेकदा पोक्षेंच्या विचारांचे समर्थन करतात तर कधी त्यांच्यावर थेट निशाणा साधतात.

आता शिवरायांवरील एका भाषणाच्या क्लीपमुळे पोंक्षे पुन्हा चर्चेत आलेयत. या भाषणातील पोंक्षेंच्या विचारांचे नटकऱ्यांनी खूप कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Sharad Ponkshe shared post on chhatrapati shivaji maharaj jijau masaheb and swarajya)

या व्हिडिओ मध्ये पोंक्षे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराजांविषयी महत्वाचं मिधान केलं आहे.

(sharad ponkshe ) पोंक्षे आपल्या व्याख्यानात म्हणतात, ''शिवाजी महाराजांकडे मुत्सद्देगिरी होती म्हणजे नेमकं काय होतं, तर त्यांच्या कडे राजकीय मुत्सद्दी होती. आणि ती होती कारण मासाहेब जिजाऊंनी त्यांना दोन श्री शिकवले होते.''

''एक म्हणजे श्री राम आणि दुसरे म्हणजे श्री कृष्ण.. त्यांना इतिहासच असा शिकवला होता, म्हणून ते स्वराज्य स्थापन करू शकले.कालचा भारत जिजाऊंनी महाराजांना शिकवला म्हणून महाराज उद्याचे हिंदवी स्वराज्य, हिंदुस्तान स्थापन करू शकले..'' असे विचार पोंक्षे यांनी मांडले आहेत.

या व्हिडिओची सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चा आहे. अनेकांनी या व्हिडिओ वर कमेंट करत पोंक्षे यांचे कौतुक केले आहे तर अनेकांनी 'जय श्री राम'चा नारा दिला आहे.

तर काहींनी पोंक्षे यांच्यावर टीका देखील केली आहे. 'पोंक्षे म्हणजे करियर संपलेला अभिनेता..' अशा शब्दात नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.