
Sharad Ponkshe: तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना विचाराल का? की तू आई वडिलांकडून.. पोंक्षेच्या विधानाने वेधलं लक्ष
Sharad Ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर खूल्यापणे भाष्यही करत असतात.
पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच चांगलिच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. आज त्यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे.
ज्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे. अगदी लहान वयातही सावरकरांची बुद्धीमत्ता किती तल्लख होती आणि समोरच्याला सडेतोडपणे प्रश्न विचारण्याची त्यांची धमक काय होती, हे पोंक्षे यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
(Sharad Ponkshe shared swatantryaveer savarkar childhood memory and dnyaneshwar mauli)
शरद पोंक्षे म्हणतात, 'तात्यारावांच्या लहानपणीची गोष्ट आज तुम्हाला सांगतो. तात्यारावांनी एका वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी अर्धा-पाऊण तास त्यांनी दमदार भाषण केलं. टाळ्यांचा कडकडाट झाला.'
'त्यांच्या बरोबरीची मुलं मात्र पाच- सहा मिनिटांच्या वर बोलू शकली नाहीत. निकाल लागला पण बक्षीस काही विनायकाला मिळू शकलं नाही. मग सावरकरांनी मास्तरांना विचारलं, की मला बक्षिस का मिळू शकलं नाही. तर मास्तर म्हणाले, ही वक्तृत्व स्पर्धा होती, पाठांतर स्पर्धा नव्हती. तू तुझं भाषण आई वडिलांकडून लिहून आणलं होतं.'
''त्यावर सावरकर मास्तरांना म्हणाले, मी हे भाषण स्वतः लिहिलं होतं. हाच प्रश्न तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना विचाराल का? की ज्ञानेश्वरी तू आई वडिलांकडून लिहून आणली होती का म्हणून.. असा हा स्वाभिमानी मुलगा, विनायक दामोदर सावरकर.. ज्याच्या बुद्धीमत्तेची चुकून शालेय जीवनापासूनच दिसू लागली होती.''असे शरद पोंक्षे या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.