Sharad Ponkshe: स्वातंत्र्याचं श्रेय नक्की कुणाला? सावरकरांच्या जयंतीनिमित्त शरद पोंक्षेचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Ponkshe shared video on veer savarkar jayanti and independence credit mahatma gandhi

Sharad Ponkshe: स्वातंत्र्याचं श्रेय नक्की कुणाला? सावरकरांच्या जयंतीनिमित्त शरद पोंक्षेचं मोठं विधान

sharad ponkshe on savarkar: देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे एक थोर क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांचे कार्य, हिंदुत्वाप्रती असलेली आस्था, मराठी वरील प्रेम आणि देश सेवेसाठी दिलेले योगदान प्रचंड मोठे आहे. आज वीर सावरकर यांची जयंती.

या दिनाचे औचित्य साधून अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानातील आहे. यावेळी शरद पोंक्षे केवळ सावरकर नाही तर गांधी यांच्यावरही बोलले आहेत.

स्वातंत्र्याचं श्रेय नक्की कुणाचं यावर ते या व्याख्यानात बोलले आहे. या व्हिडिओ मध्ये त्यांनी अत्यंत मोठे विधान केले असून हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

(Sharad Ponkshe shared video on veer savarkar jayanti and independence credit mahatma gandhi)

स्वातंत्र्याचं योगदान नेमकं कुणाचं, यावर पोंक्षे म्हणतात, ''भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका सावरकरांना कुणीतरी विचारलं.. की या सगळ्याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल. गांधींच्या योगदानाला द्याल की तुम्ही स्वीकारलेल्या क्रांतीकारकांच्या मार्गाला द्याल.''

''तर त्यावर सावरकर म्हणाले, केवळ गांधी किंवा सावरकरच नाही तर ज्याने ज्याने आपापल्या परीनं आपापल्या कुवतीनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलंय अशांचं आणि ज्यांची कुवतच नाही अशीही माणसं या देशात असतील त्यांचंही हे श्रेय आहे.''

''कारण ज्यांच्याकडे कुवत नाही ती माणसं घरात बसून प्रार्थना करत असतील. की, माझ्याकडे बुद्धी नाही, मी काही लिहू शकत नाही, माझ्या अंगात ताकद नाही, हिम्मत नाही की मी बाहेर जाऊन क्रांती कार्यात, चळवळीत, मोर्चात सहभागी होऊ शकेल असं वाटत नाही. मग मी काय करू शकतो तर मी माझ्या देवाकडे प्रार्थना करू शकतो.''

''की देवा माझ्या राष्ट्राला स्वातंत्र्य दे. म्हणून सावरकर म्हणतात, हे श्रेय जेवढं गांधींचं आहे , जेवढं क्रांतीकारकांचं आहे, तेवढंनच घराघरात बसून डरपोक माणसाने देवाला जी प्रार्थना केली ना, त्यांचंही स्वातंत्र्याच्या कार्यात तेवढंच योगदान आहे. '' असे विचार पोंक्षे यांनी मांडले आहेत.

अभिनेते शरद पोंक्षे हे अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. त्यातीलच हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.