
Shark Tank India season 2 : शार्क टँकमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक करणारा आहे कोण? कुणाची सावध खेळी?
Shark Tank India season 2 : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध रियॅलिटी शो शार्क टँकचा सध्या दुसरा सीझन सुरु आहे. या शो जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्याची लोकप्रियता ही कायम राहिली आहे. देशातील नवउद्योजकांच्या नवनव्या कल्पनांना संधी देणं, त्यांना पाठबळ देण्याचे काम या शोच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यात सहभागी झालेले जजेस हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत.
शार्क टँकमध्ये सहभागी झालेल्या जजेसनं आतापर्यत किती कोटींची गुंतवणूक केली हा नेहमीच नेटकऱ्यांना पडणारा प्रश्न आहे. शार्क इंडियामध्ये लेन्सकार्टचे सीइओ पियुष बन्सल, शादी डॉट कॉमचे संस्थापक अध्यक्ष अनुपम मित्तल, शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनिता सिंग, इमक्योर फार्मासिटिकल्सच्या प्रमुख नमिता थापर, कार देखोचे सीईओ अमिता जैन आणि बोटचे संस्थापक अमन गुप्ता जजेस म्हणून सहभागी झाले आहेत.
Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
शार्क टँकमध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून उद्योजक आपली स्टार्ट अप्सची कल्पना घेऊन आले असून त्यांना जजेसनं आर्थिक आधार देण्याचे काम केले आहे. संबंधित उद्योजकांच्या व्यवसायात काही भाग भांडवलाची गुंतवणूक करुन त्यांच्या उद्योजकतेला पाठींबा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासगळ्यात सहभागी जजेसनं आतापर्यत किती रुपयांची गुंतवणूक केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
शार्क टँकच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या मोठ्या पाठींब्यानंतर त्याच्या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. यासगळ्यात शोमधील सहभागी सर्व जजेसनं मिळून तब्बत ८१.१६ कोटींची गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. २ जानेवारीला सुरु झालेल्या शार्क टँकचा शेवटचा एपिसोड १० मार्च रोजी टेलिकास्ट झाला. यावेळी जजेसनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
नमिता थापर -
इमक्योरच्या हेड नमिता थापर यांनी शार्क टँकच्या दुसऱ्या सीझनमध्ये १९.०४ कोटींची गुंतवणूक केली आहे. इतर जजेसच्या तुलनेत नमिता यांचा गुंतवणूक करण्याकडे कल कमी असला तरी त्यांनी नेहमीच स्टार्ट अप्सच्या नवनव्या आय़डिया घेऊन येणाऱ्या उद्योजकांना प्रेरित केले आहे.
अमन गुप्ता -
तरुणाईमध्ये आपल्या आगळ्या प्रॉडक्टसनं लोकप्रिय झालेल्या बोट्सच्या संस्थापक अमन गुप्ता यांनी देखील फार मोठी गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी दुसऱ्या सीझनमध्ये केलेली गुंतवणूक ही १७.८४ कोटींची आहे.
पियुष बन्सल -
लेन्सकार्ट या कंपनीसाठी ओळखले गेलेल्या पियुष बन्सल यांनी सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये गुंतवणूक करण्यात रस दाखवला होता. मात्र त्यानंतर त्यांनी सावध भूमिका घेत प्रत्यक्षात गुंतवणूक करताना काळजीपूर्वक विचार केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आतापर्यत १६.१६ कोटींची गुंतवणूक केली आहे.
अनुपम मित्तल -
शादी डॉट कॉममुळे केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये प्रसिद्ध झालेल्या अनुपम मित्तल यांच्या गुंतवणूकीचा आकडा हा इतर जजेसच्या तुलनेत फारच कमी आहे. शो मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडणाऱ्या अनुपम मित्तल यांनी केवळ पावणे दहा कोटींची गुंतवणूक केली आहे.
विनिता सिंग -
शुगर कॉस्मेटिक्सच्या सह संस्थापक विनिता सिंग यांनी देखील गुंतवणूक करण्यात फारसा पुढाकार घेतलेला नाही. त्यांनी देखील ९.६९ कोटींची गुंतवणूक केली आहे.
अमित जैन -
अमित जैन यांच्या कार देखो या अॅपला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यासाठी ते लोकप्रिय आहेत. त्यांनी देखील शार्क टँकच्या दुसऱ्या सीझनमधून ८.६६ कोटींची गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे.