esakal | ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज; नीतू झाल्या भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज; नीतू झाल्या भावूक

ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमासह अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’ या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. या पोस्टरमध्ये थंडींचे वातावरण दाखविण्यात आले असून ऋषी कपूर यांनी स्वेटर आणि गळ्यात मफलर गुंडाळालेला आहे आणि एक सूटकेस त्यांच्या हातात दिसत असून एक हास्य चेहाऱ्यावर ठेवत मस्त ऐटीत चालत आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये सेम लूकमध्ये अभिनेते परेश रावल दिसत आहेत कारण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर चित्रपटातील उरेललं शुट त्यांनीच पूर्ण केले आहे.

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलिज; नीतू झाल्या भावूक

sakal_logo
By
शरयू काकडे

HBD Rishi Kapoor : बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor)यांच्या निधनाला आता एक वर्ष झाले पण आज त्यांच्या ६९व्या जन्मदिनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. प्रेक्षकही 'शर्माजी नमकीन' चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहे. ऋषी कपूर यांचे निधन झाले त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील बऱ्याच भागासाठी शूटींग केलं होतं. हा चित्रपट गेल्याच वर्षी याच तारखेला रिलीज करण्यात येणार होता पण कोरोनामुळे या चित्रपटाच्या रिलीजला उशिर झाला होता.

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त ऐकून चाहती गेली कोमात

मी ऋषीजींकडून खूप काही शिकले, भावूक नीतू कपूरने शेअर केले फोटो

आज पत्नी नीतू कपूर यांनी ऋषी कपूर त्यांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम अकांऊटवर पोस्ट शेअर करताना दोघांचा एक फोटोही पोस्ट केला आहे. तसेच कित्येक बॉलीवूड सेलेब्स आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आठवून जन्मदिवसाच्या शूभेच्छा दिल्या.

नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली असून ऋषी कपूरसाठी एक भावूक मेसेज लिहिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ''मी न्यूयॉर्कमध्ये गेल्या काही वेदनादायक वर्षांमध्ये ऋषीजी यांच्याकडून खूप काही शिकले. जेव्हा ब्लड काऊंट जास्त होत असे तेव्हा आम्ही कसे साजरा करायचो, आम्ही एकत्र जेवायचो, खरेदी करायचो, हसायचो... जेव्हा त्यांची तब्येत खालवलेली असायची तेव्हा आम्ही घरीच राहून काहीतरी मस्त फूड ऑर्डर करायचो आणि टिव्ही पाहायचो आणि त्या क्षणीही किमोथेरपीच्या पुढच्या टप्प्यात ते चांगले होतील अशी अशा बाळगायचो. आशादायी आणि मजबूत होणे मला त्यांनीच शिकवले. प्रत्येक दिवस दिवसाचे महत्त्व जाणले...आम्हा सगळ्यांनाच त्यांची आठवण येते. मी कल्पना करू शकते त्यांच्या ६९ व्या जन्मदिवसासाठी ते किती उत्साहित झाले असतेय! मला खात्री आहे की ते तिथे आपल्या कुटुंबासोबत पार्टी करत असतील...जन्मदिवसाच्या शुभेच्छा कपूर साहेब!''

हेही वाचा: Money Heist 5: नेटकऱ्यांना दिसले विराट कोहली, बॉबी देओल; तुम्ही पाहिलंत का?

मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत नीतू कपूर

नीतू कपूर यांच्या कामाबाबत सांगायचे झाले तर त्यांनी २०१३ साली 'बेशर्म' या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि रणबीर कपूर सोबत शेवटचे काम केले होतो. आता राज मेहेता यांच्या जुग जुग जियो या आगामी चित्रपटामध्ये नीतू कपूर दिसतील. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा आडवणी मुख्य भूमिका साकारताना दिसतील.

loading image
go to top