Sharmila Tagore यांच्या बिकिनी शूटमुळे देशात पेटला होता वाद..पती मन्सूर अली खान पतौडी तर म्हणालेले..Sharmila Tagore on Bikini Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmila Tagore on Bikini Controversy

Sharmila Tagore यांच्या बिकिनी शूटमुळे देशात पेटला होता वाद..पती मन्सूर अली खान पतौडी तर म्हणालेले..

Sharmila Tagore: अभिनेत्रींनी स्वीमसूट घालून फोटोशूट करणं ही आता खूप सर्वसाधारण गोष्ट आहे. पण जेव्हा १९६६ मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकिनी घातली होती तेव्हा जबरदस्त वाद पेटला होता. स्वीमसूट घातलेल्या शर्मिला टागोर यांचे फोटो काढायला तेव्हा फोटोग्राफर देखील थोडं मागेपुढे करत होता असं देखील समोर आलं होतं.

जेव्हा त्यांचे बिकिनीतील फोटो मॅगझीनच्या कव्हर पेजवर आले तेव्हा त्या लंडनमध्ये होत्या पण भारतात मात्र त्या फोटोंनी खळबळ उडवू दिली होती. एवढंच नाही तर त्यांच्या काही जवळच्या दिग्दर्शकांना वाटू लागलं होतं की शर्मिला यांना फक्त व्हॅम्पच्या भूमिकाच मिळतील.

शर्मिला टागोर यांनी आता एका मुलाखतीत ते फोटो पाहून त्यावर त्यांचे पती आणि त्यावेळचे बॉयफ्रेंड मन्सूर अली खान पतौडी यांची रिअॅक्शन काय होती याविषयी खुलासा केला आहे..(Sharmila Tagore on Bikini Controversy reaction of mansoor ali khan)

शर्मिला टागोर यांनी बरखा दत्त यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बिकिनी फोटोशूटवरनं देशात खळबळ माजली होती याविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. हे शूट फिल्मफेअर मॅगझीनसाठी होतं.

शर्मिला म्हणाल्या,''मी हे शूट करून खूप खूश होते पण जेव्हा यावर लोकांच्या रिअॅक्शन पाहिल्या तर वाटलं..बापरे...हे खूपच भयानक काहीतरी घडतंय. दिग्दर्शक शक्ती सामंता खूप चिंतेत पडले आणि मला फोन करून म्हणाले,प्लीज..मला येऊन भेट''.

''तिथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या मनातील भीती माझ्याकडे व्यक्त केली. त्यांना वाटत होतं की या बिकिनी शूटमुळे मला व्हॅम्पच्या भूमिकाच मिळतील''.

शर्मिला टागोर म्हणाल्या की,'' या सगळ्या वादा दरम्यान मन्सून अली खान पतौडी बाहेर होते. त्यामुळे मी त्यांना टेलिग्राम करून या सगळ्या वादाविषयीची कल्पना दिली''.

''यावर मन्सूरचं उत्तर आलं की, 'मला खात्री आहे तू या कॉश्युममध्ये खूप सुंदर दिसत असशील',आणि मला माझा पहिला पाठिंबा मिळाला''.

शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या,''त्यावेळी अभिनेत्री आणि व्हॅम्पमध्ये एक छोटासा फरक होता..ज्यावरनं अभिनेत्री आणि व्हॅम्प ओळखल्या जायच्या. हेलन ज्यांनी खूप नकारात्मक भूमिका केल्या होत्या..त्यांनी काहीही घातलं तरी चालत होतं पण अभिनेत्रींना ते स्वातंत्र्य नव्हतं''.

शर्मिला टागोर यांनी आपल्या एका जु्न्या मुलाखतीत या बिकिनी शूटमुळे त्यांना काय शिकवण मिळाली होती याविषयी सांगितलं होतं.

त्या या वादातून शिकल्या की. ''जर तुम्ही पब्लिक फिगर आहात तर तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात. तुम्हाला हे समजायला हवं की तुमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात''.

आणि शर्मिला यांना लोकांकडून तो सम्मान हवा होता म्हणून त्यांनी स्वतःला हळूहळू बदललं.