Shatrughan Sinha: 'केआरकेची बाजू घेतली, लोकं सोनाक्षीबद्दल वाट्टेल तसं बोलली'!

दरवेळी आपल्या बोलण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या केआरकेची बाजूनं बोलणं आता प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा महागात पडलं आहे.
Shatrughan Sinha
Shatrughan Sinhaesakal

Shatrunghan Sinha Trolled: दरवेळी आपल्या बोलण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या केआरकेची बाजूनं बोलणं आता प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा महागात पडलं आहे. त्यांनी आपण जेव्हा त्याच्या बाजुनं बोललो त्याचा परिणाम आपल्या मुलीच्या करिअरवर होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शत्रुघ्न सिन्हा यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिन्ही यांनी केआरकेच्या वतीनं काही वक्तव्यं केली होती. त्याचा उलटाच परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी कमाल राशिद खान अर्थात केआरकेला मुंबई पोलिसांनी त्याच्या बेताल वक्तव्यामुळे अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. याच वेळी त्याच्या बाजुनं बोलल्याप्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. सिन्हा यांनी एका मुलाखतीमध्ये आपण जेव्हा केआरकेच्या बाजुनं बोललो तेव्हा आपल्याला लोकांनी खुप दोष दिला आहे. खासकरुन माझ्या मुलीला लोकांनी अश्लील कमेंट देण्यास सुरुवात केली आहे. ते पाहून मला खुप वाईट वाटले.

माझ्याबरोबरच नेटकऱ्यांनी सोनाक्षीला देखील ट्रोल केले आहे. याला काय अर्थ आहे? मी फक्त माझी केआरकेच्या बाजुनं जी भूमिका होती ती मांडली. त्यावरुन आता लोकं सोनाक्षीविषयी काहीही बोलू लागली आहेत. तिच्याविषयी खालच्या पातळीवर जात कमेंट करत आहेत. केआरके हा केवळ चांगला कलाकार नाही म्हणून त्याला ज्याप्रकारे वागवले जात आहे यावरुन मी भाष्य केले होते. लोकं हे लक्षात घ्यायला तयार नाही.

Shatrughan Sinha
PS 1 Review: पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण निव्वळ 'रटाळवाणा'

केआरकेला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली होती. मात्र त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसून आले. त्यांनी लिहिलं होतं की, कुणालाही केआरकेचा विसर पडता कामा नये. त्यानं मोठ्या संघर्षातून आपली वेगळी वाट निर्माण केली आहे. त्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्याचे म्हणणे हे अनेकांना दुखावते पण त्यात तथ्य आहे. असे सिन्हा यांनी म्हटले होते.

Shatrughan Sinha
Viral Video: वडिलांचे कर्ज माफ करण्यासाठी मुलाला करायला लावली 'नग्नपूजा'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com