तुनिषा शर्मा प्रकरणातील आरोपी शीझान खानच्या बाबतीत कोर्टाचा मोठा निर्णय..|Sheezan Khan | Sheezan Khan Gets Permission From Court To Go Abroad |Sheezan Khan gets permission to travel abroad for Khatron Ke Khiladi 13 viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sheezan khan, sheezan khan news, tunisha sharma, tunisha sharma news, tunisha sharma end her life

Sheezan Khan: तुनिषा शर्मा प्रकरणातील आरोपी शीझान खानच्या बाबतीत कोर्टाचा मोठा निर्णय..

Sheezan Khan Gets Permission From Court To Go Abroad: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अभिनेता शीझान खान बाहेर आला आहे. तुरुंगातून सुटून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, शिजानने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे.

त्याच्या अटकेनंतर त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला होता, तो परत मिळवण्यासाठी त्याने आता कोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी जप्त केलेला पासपोर्ट परत करण्यासाठी शीझानने वसई न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

शीझानचा हा अर्ज मुंबईच्या वसई न्यायालयाने मंजूर केला आहे. शीझानला परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी न्यायालयाने प्राधिकरणाला त्यांचे पासपोर्ट परत करण्यास सांगितले आहे.

शीझान खान यांनी त्यांचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय यांच्यामार्फत न्यायालयात पासपोर्ट तात्पुरता परत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात वकिलाने न्यायालयाला सांगितले की, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीझानचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जामिनावर असलेल्या आरोपीला काम करण्याची मुभा दिली जाते. त्याचआधारे वसई कोर्टाने शीझानचा अर्ज स्वीकारला आहे.

याआधी मीडिया रिपोर्टनुसार शीझान खतरों के खिलाडी 13 साठी फायनल झाला आहे, त्यामुळे तो कदाचित या महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात इतर स्पर्धकांसोबत परदेशात जाऊ शकतो. त्यासाठीच त्याला पासपोर्टची गरज भासली होती.

शीझान शेवटचा अली बाबा: दास्तान-ए-काबुल या शो मध्ये दिसला होता. याच शोच्या सेटवर त्याची कोस्टार तुनिषा हिने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आईने शीझान खानवर गंभीर आरोप करत त्यालाच या आत्महत्यतेसाठी जबाबदार ठरवले होते. आता शिजान पुन्हा त्याच्या कामावर परतल्याच दिसतय.