
Sheezan Khan: 'तुनिषा जिवंत असती तर...'तुरुंगाबाहेर येताच शीझान खाननं आत्महत्या प्रकरणावर मौन सोडलं
तुनिषा शर्मा आत्महत्येने मनोरंजन विश्वात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' च्या सेटवर गळफास घेवुन तिचं जीवन संपवलं होतं. या आत्महत्या प्रकरणात तिचा मित्र आणि कोस्टर शीझान खानला अटक करण्यात आली होती. 70 दिवस तुरुंगात काढल्यानंतर अखेर त्याला बाहेर काढण्यात आहे.
तुनिषा शर्माच्या कथित आत्महत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अभिनेत्रीच्या आईने अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
आता तो बाहेर आल्याने आई आणि दोन्ही बहिणी खूप खूश आहेत. त्याने एका मुलाखतीत तुनिशाबद्दल सांगितलं आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
शीझान खानने 'बॉम्बे टाइम्स'ला मुलाखत दिली यात त्याने तुरुंगातून बाहेर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला म्हणला की, 'आज मी स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजू शकलो आहे. मी ते अनुभवू शकतो. आई आणि बहिणींना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आल्या. आता त्यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे.
शीझान खान म्हणाला, 'शेवटी मी माझ्या कुटुंबासोबत आहे. मला खुप चांगल आहे. मला फक्त काही दिवस माझ्या आईच्या मांडीवर झोपायचयं. तिच्या हातचं जेवण करायचयं आणि माझ्या बहिणी आणि भावासोबत वेळ घालवायचा आहे.
यावेळी जेव्हा त्याला तुनिशाबद्दल तो म्हणाला, 'मला तिची आठवण येते आणि ती जिवंत असती तर तिने माझ्यासाठी लढा दिला असता.'
तुनिषा शर्माने 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना 24 डिसेंबरला घडली आणि 25 डिसेंबरला शीजानला अटक करण्यात आली. या घटनेच्या १५ दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. अशा परिस्थितीत हा अभिनेता संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता.