Shehnaaz Gill: 'इतक्या लवकर विसरलीस सिद्धार्थला?'.. राघव जुयालसोबत शहनाझचा 'तो' व्हिडीओ व्हायरल अन् नेटकऱ्यांचा संताप

शहनाझ गिल अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून तिचं नावं राघव जुयालसोबत जोडलं जात आहे.
Shehnaaz Gill
Shehnaaz GillInstagram

Shehnaaz Gill Troll: शहनाझ गिल आता लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. सलमान खानचा 'किसी का भाई..किसी की जान' सिनेमात ती दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहनाझचं नाव राघव जुयालसोबत जोडलं जात आहे.

दोघं लपून-छपून टूरवर देखील जात असल्याचं समोर आलं आहे. आता शहनाझनं राघव आणि सिद्धार्थ सोबत रील शेअर केली आहे. ज्याला पाहिल्यानंतर नेटकरी मात्र संतापले आहेत आणि 'सिद्धार्थ शुक्लाला इतक्या लवकर विसरलीस का?' असा सवाल करत आहेत.

Shehnaaz Gill
Taarak Mehta ka Ooltah Chashmah मालिकेवर येतोय सिनेमा.. कोण असणार जेठालाल आणि दयाबेन..काय म्हणाले निर्माते?

या व्हिडीओत शहनाझ गिलनं 'किसी का भाई..किसी की जान' सिनेमाविषयी अपडेट दिली आहे. सिनेमा रिलीज व्हायला फक्त ३० दिवस बाकी आहेत. तिनं व्हिडीओ पो्स्ट केलाय ज्यात तिच्यासोबत राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम देखील आहेत.

शहनाझ गिलची राघव जुयालसोबत रील पाहिल्यानंतर आता काही नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. ते शहनाझला नको-नको ते सुनावू लागले आहेत.

एकानं लिहिलं आहे की,'शहनाझ सिद्धार्थला लवकर विसरली आणि आता राघवसोबत लिव्ह इन मध्ये राहतेय. कुणीतरीबरोबर बोललं होतं की ही मुलगी काही ठीक नाही'.

तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'शहनाझ राघवसोबत लग्न कधी करतेयस'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की.'पुणे,मुंबई,लोनावळा,गोवा,देहरादून अशा खूप ट्रीप केल्यात हिनं राघवसोबत..ते देखील सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ६ महिन्याच्या आतच'.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

शहनाझ सध्या 'देसी वाइब्स विथ शहनाझ गिल' या आपल्या शो मुळे देखील प्रसिद्ध आहे. या शो मध्ये सुनील शेट्टी पासून कपिल शर्मा आणि शाहीद कपूर सारख्या अनेक स्टार्सनी सहभाग घेतला होता.

Shehnaaz Gill
Bajrangi Bhaijaan 2 मधून करीनाचा पत्ता कट?; सीक्वेलमध्ये 'ही' साऊथ अभिनेत्री दिसणार अशी चर्चा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com