एंटरटेनमेंट क्वीन शेहनाझ गिल काय म्हणाली पहा; नेटकरीही झाले हैराण

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या व्हिडीओ पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचनीय आहेत.
Shehnaaz Gill Latest News
Shehnaaz Gill Latest NewsGoogle

'बिग बॉस 13' च्या सिझनमध्ये सर्वात जास्त कुणी प्रेक्षकांचे मनोरंजन केले असेल तर ते पंजाबच्या शेहनाझ गिलने. तिच्या भाषेतला पंजाबी लहेजा ऐकताना खूप गोड वाटायचा. ती लहान मुलांसारखं वागत,बोलत असली तरी तिच्या चेहऱ्यातील,वागण्यातील निरागसता मनाला स्पर्शून जायची. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची मैत्री सर्वात अधिक पसंत केली गेली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही सिद्धार्थच्या शेवटच्या श्वासापर्यंत शहनाझ त्याच्यासोबत कायम दिसली. त्याच्या अचानक जाण्यानं कोसळलेली शेहनाझही सर्वांनी पाहिली. कदाचित त्यानंतर शेहनाझ जितक्यांदा नजरेस पडली तिच्या वागण्यात पहिल्यातला खेळकरपणा फारसा दिसला नाही. आता 'बिग बॉस 15' च्या अंतिम सोहळ्यातही ती जेव्हा आली तेव्हा सलमानला भेटताच सिद्धार्थच्या आठवणी जाग्या झाल्या अन् तिच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटलेला आपण साऱ्यांनी पाहिला. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती असं काही म्हणून गेली आहे की नेटकऱ्यांना मात्र प्रश्न पडला आहे. 'शेहनाझ असं का म्हणतेयस?' अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहेत. (Shehnaaz Gill Latest News)

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेहनाझची ही व्हिडीओ रील सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात शेहनाझ आजचा दिवस खूप 'बोअरिंग डे' असं म्हणत आहे. तिची ही व्हिडीओ रील सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणालं आहे,'तू असं का म्हणतेस,तुझ्यासारख्या एंटरटेनिंग मुलीचा दिवस बोअरिंग कसा असू शकेल?',कुणी म्हणालं आहे,'कोणताही दिवस इंटरेस्टिंग करणं तुला नक्कीच जमेल'. तर कुणी म्हणालं आहे,'आता तूच असं म्हणशील तर आम्ही काय करायचं?' शहनाझ आता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होताना पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com