'शहजादा' चे लाड 'पठाण' पुढे चालेना! दुसऱ्या दिवशी किती कमावले? Shehzada Box Office Collection Day 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehzada Box Office Collection Day 2

Shehzada Box Office Collection Day 2: 'शहजादा' चे लाड 'पठाण' पुढे चालेना! दुसऱ्या दिवशी किती कमावले?

कार्तिक आर्यननं त्याच्या 'शहजादा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पार जिवाचं रान केलं. दिल्लीतील इंडिया गेटपासून दुबईतील बुर्ज खलिफापर्यंत सगळी कडेच चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्याचा 'शहजादा' हा चित्रपट आज म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

कार्तिक आर्यनचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच हवा होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. मात्र ते कलेक्शन अपेक्षेप्रमाणे झाले नाही.त्यामुळं आता नजरा आता शनिवारच्या कलेक्शनकडे होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या शनिवारी या चित्रपटाने भारतात फक्त 7 कोटींची कमाई केली आहे. अनेक अहवालात हे 7 ते 9 कोटी रुपयांच्या दरम्यान सांगत आहेत. वीकेंडला आलेल्या 'महा शिवरात्री'मुळे चित्रपटाला थोडी हायप मिळाली, पण समीक्षकांना त्याच्याकडून अधिक अपेक्षा होत्या. आता पहिल्या रविवारपासून हा चित्रपट किती कोटींचा गल्ला कमावेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'शहजादा' हा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठापुरामुलू' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला, रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवनने केले आहे. कार्तिक स्वतः या चित्रपटाचा निर्माता आहे.

दुसरीकडे पठाण बाबत बोलायचं झालं तर चित्रपटाची क्रेझ काही कमी होतांना दिसत नाही आहे. तरण आदर्शने ट्विट करत लिहिले, "पठाणचा वेग कमी होत नाही... #पठाणची रणनीतीचे [तिकीट दर कमी करणे] याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे." दोन मोठे रिलीज असूनही #Shehzada, #AntManAndTheWasp, आठवडा 4 या चित्रपटाने शुक्रवारी 2.20 कोटी व्यवसाय केला आहे. म्हणजेच एकूण: ₹ 490.35 कोटीची कमाई केली आहे. आजपासून पठाणचे शो वाढवण्यात आले आहेत.