Shehzada Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'शहजादा'ची वाईट अवस्था, सहाव्या दिवशी कमाईत मोठी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kartik aaryan

Shehzada Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'शहजादा'ची वाईट अवस्था, सहाव्या दिवशी कमाईत मोठी घसरण

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन स्टारर 'शेहजादा' चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षक मिळत नाहीयेत. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण रिलीजनंतर 'शहजादा' प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरला आहे. 'शहजादा'साठी त्याचे बजेटही काढणे कठीण जात आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

डेव्हिड धवनचा मुलगा रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' या चित्रपटाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रोहितने हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला पण 'शहजादा' प्रेक्षकांच्या कसोटीवर टिकला नाही आणि चित्रपटाची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'शहजादाने'

पहिल्या दिवशी 6 कोटी जमा झाले.

दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6.65 कोटींची कमाई केली.

तिसऱ्या दिवशी 'शेहजादा'ने 7.55 कोटींची कमाई केली.

चौथ्या दिवशी चित्रपटाने केवळ 2.25 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाने पाचव्या दिवशी केवळ 2.06 कोटींची कमाई केली.

चित्रपटाने सहाव्या दिवशी केवळ 1.80 कोटी रुपयांची कमाई केली.

चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 26.31 कोटी रुपये झाले आहे.

'शहजादा'मध्ये कार्तिक आणि क्रितीशिवाय रोनित रॉय, मनीषा कोईराला, परेश रावल आणि सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे, तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही. 'शहजादा' हा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा तेलगू चित्रपट 'अला वैकुंठापुरामुलू'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

'शहजादा' 85 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. मात्र चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झाले असून निम्मा खर्चही वसूल करण्यात 'शहजादा' अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत कार्तिकच्या या चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीने तो फ्लॉपच्या श्रेणीत आणला आहे.