'ई सकाळ'च्या लाइव्ह शोमध्ये टीम झाली 'शेंटिमेंटल'

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
बुधवार, 12 जुलै 2017

आयुष्यात पहिल्यांदा अशोक सराफ ई सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आले. आणि मग उजळा मिळाला जुन्या आठवणींना आणि शेॆटिमेंटल सिनेमाच्या गमतीजमतीना. 

पुणे: अशोक सराफ या नावातच एक जादू आहे. अफलातून टायमिंग, आवाजाचा सुरेख मेळ आणि अस्सल निरागस हावभाव या भांडवलावर अशोक सराफ यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. आज तब्बल 47 वर्ष ते मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत काम करतायंत. आता त्यांचा शेंटिमेंटल हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यानिमित्त आयुष्यात पहिल्यांदा अशोक सराफ ई सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आले. आणि मग उजळा मिळाला जुन्या आठवणींना आणि शेॆटिमेंटल सिनेमाच्या गमतीजमतीना. 

आयुष्यातील पहिले फेसबुक लाईव्ह करण्याचा अनुभव सांगताना अशोक सराफ म्हणाले, लाइव्ह काम करणे मला नवे नाही. नाटकात काम करत असल्यामुळे तेवढा अंदाज आहे. आता डिजिटल युगात हा नवा उपक्रम आहे, तो मजेदार आहे. लोक थेट संवाद साधू शकतात हे छान आहे. 

यानंतर सुरू झाला संवाद. अशोक मामांनी साकारलेल्या भूमिका, त्यांच्या आवडत्या भूमिका आणि बरंच काही. आॅनलाईन विश्वानेही या उपक्रमाला भरभरून दाद दिली. जवळपास 15 हजार व्ह्यूअर्सनी हा लाइव्ह शो पाहिला. हा आकडा आता वाढताच आहे. या टाॅकमध्ये सराफ यांच्यासह सामील झाले ते दिग्दर्शक समीर पाटील आणि रमेश वाणी. त्यांनीही या सिनेमाच्या आठवणी सांगितल्या. 

अशोक सराफ संवाद लाईव्ह..

शेॆटिमेंटल सिनेमाची टीम मोठी असल्याने यावेळी त्याचे दोन भाग करण्यात आले. दुसऱ्या भागात पल्लवी पाटील, विकास पाटील आणि सुयोग गोऱ्हे हे आजच्या पिढीचे तीन प्रतिनिधी समील झाले. त्यांच्याही या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत. या लाईव्ह शोमध्ये तिघांनीही सिनेमाबद्दलचे आपले अनुभव सांगितले. आणि गमतीजमतीही शेअर केल्या. 

विकास, पल्लवी, सुयोग लाईव्ह..

या दोन्ही लाईव्ह शोला रसिकांचा अमाप प्रतिसाद लाभला. हे व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी ई सकाळचे आभारही मानले. 

 

Web Title: shentimental team live esakal news