Sherni Trailer : प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात 'शेरनी' विद्या यशस्वी ठरेल का?

'न्यूटन'चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी केलं 'शेरनी'चं दिग्दर्शन
actress vidya balan movie
actress vidya balan movie Team esakal

अभिनेत्री विद्या बालनची Vidya Balan मुख्य भूमिका असलेल्या 'शेरनी' Sherni Official Trailer या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील विद्याचा लूक प्रदर्शित केल्यापासून कथेविषयीची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. 'शेरनी' हा चित्रपट १८ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विद्यासोबतच शरत सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज कबी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये विद्या बालनला फारसे संवाद दिले नसले तरी ती तिच्या नजरेतून खूप काही बोलून जाते. (Sherni Official Trailer Vidya Balan Vijay Raaz Neeraj Kabi Amazon Prime Video)

या चित्रपटाविषयी विद्या म्हणाली, "शेरनीची कथा पहिल्यांदा ऐकली, तेव्हापासूनच माझ्या मनात त्याविषयी फार उत्सुकतेची भावना निर्माण झाली. माझ्या भूमिकेला फार संवाद नाहीत, पण ती तिच्या नजरेतूनच खूप काही सांगून जाते. एका संवेदनशील विषयावर आधारित हा चित्रपट आहे. केवळ मनुष्य आणि प्राणी यांच्यातीलच नव्हे तर माणसांमध्ये एकमेकांविषयी असलेला आदर, परस्पर समन्वय, सहअस्तित्व या विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो."

actress vidya balan movie
न्यूड सीन शूट करण्यापूर्वी राधिका आपटेशी काय चर्चा झाली? आदिल हुसैनचा खुलासा

या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित मसूरकर यांनी केलंय. "शेरनी ही समाजातील विविध स्तरांमध्ये असलेल्या गुंतागुंतीची कथा आहे. यामध्ये विद्या ही वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. दबाव, अडथळे असूनही स्थानिक सहकाऱ्यांसोबत मिळून ती कशा पद्धतीने काम करते, हे पाहण्याजोगं असेल," असं ते म्हणाले.

भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि अमित मसूरकर निर्मित, शेरनी हा चित्रपट १८ जून २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com