शिल्पा नवलकरची "दुहेरी'त एन्ट्री 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

स्टार प्रवाह वाहिनीवरील "दुहेरी' मालिकेत अभिनेत्री शिल्पा नवलकरची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत नवीन ट्‌विस्ट येणार आहे. यातील नायक दुष्यंतच्या भूतकाळातील एक मोठे सत्य बाहेर येणार आहे. त्याची आत्या हीच खरी आई असल्याचे सत्य बाहेर येणार आहे. त्याच्या आत्याची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांची निवड केली होती. काही भागांचे शूटिंगही करण्यात आले होते; पण त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे आता ही भूमिका शिल्पा नवलकर करणार आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, "ही भूमिका माझ्याकडे आली, तेव्हा त्या भूमिकेवर अश्‍विनीची छाप होती. ती माझी खूप जुनी मैत्रीण होती.

स्टार प्रवाह वाहिनीवरील "दुहेरी' मालिकेत अभिनेत्री शिल्पा नवलकरची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत नवीन ट्‌विस्ट येणार आहे. यातील नायक दुष्यंतच्या भूतकाळातील एक मोठे सत्य बाहेर येणार आहे. त्याची आत्या हीच खरी आई असल्याचे सत्य बाहेर येणार आहे. त्याच्या आत्याची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांची निवड केली होती. काही भागांचे शूटिंगही करण्यात आले होते; पण त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे आता ही भूमिका शिल्पा नवलकर करणार आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, "ही भूमिका माझ्याकडे आली, तेव्हा त्या भूमिकेवर अश्‍विनीची छाप होती. ती माझी खूप जुनी मैत्रीण होती. त्यामुळे तिला श्रद्धांजली देण्यासाठी मी ही भूमिका स्वीकारली.' 

Web Title: shilpa navalkar in duheri serial