esakal | ‘कोरोना प्यार हैं…’; शिल्पा- राजचा रोमॅंटिक फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa shetty and raj kundra

‘कोरोना प्यार हैं…’; शिल्पा-राजचा रोमॅंटिक फोटो व्हायरल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. शिल्पा सध्या घरात क्वारंटाइन आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला (raj kundra) एक आठवड्यापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. शिल्पाने नुकताच राजसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिल्पा आणि राज यांच्यामध्ये एक काच दिसत आहे. राजने कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर स्वत:ला आयसोलेट केले आहे. (Shilpa shetty and raj kundra express love post romantic picture)

शिल्पाने राज आणि तिचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ‘कोरोना काळादरम्यान प्रेम, कोरोना प्यार हैं… आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार’. शिल्पा आणि राजच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. हा फोटो सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. अनेकांनी फोटोला कमेंट करून शिल्पा आणि तिच्या कुटुंबाला काळजी घेण्यास सांगितले आहे. शिल्पाच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पाच्या सासू तसेच तिचा मुलगा विवान आणि मुलगी समीषाला कोरोनाची लागण झाली आहे. ते सर्व सध्या घरीच उपचार घेत आहेत.

हेही वाचा: बिग बींनी घेतला लशीचा दुसरा डोस; चाहत्यांसोबत शेअर केला खास विनोद

बॉलिवूडमधील कार्तिक आर्यन, अक्षय कुमार, आमिर खान, भूमी पेडणेकर या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईमध्ये सध्या चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

हेही वाचा: कॉमेडियन मल्लिका दुआच्या आईवडिलांना कोरोना; रुग्णालयात दाखल