शिल्पाचा पाहुणचार 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

अमेरिकन टॉक शोमध्ये भारतातील स्टार सेलिब्रेटी झळकणार ही नेहमीच भारतीयांसाठी मानाची बाब आणि सेलिब्रेटींसाठी त्याचे स्टारडम किती मोठे आहे हे दाखविण्याची संधी असते. अमेरिकन टॉक शो चेलसी हॅंडलरस्‌ शोमध्ये शिल्पा शेट्टी झळकणार असल्याचे समजते आहे. या शो चा होस्ट चेलसी हॅंडलर नुकताच भारतात येऊन गेला. त्याने शोच्या दुसऱ्या सीझनसाठी भारतातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो शिल्पा शेट्टीच्या घरी पाहुणचाराला होता. फिटनेस फ्रिक शिल्पानेही त्याला अस्सल भारतीय पंजाबी ग्लुटेन फ्री आणि तेही घरी बनवलेले पदार्थ खाऊ घातले. मग काय... चेलसी महाराज खूश!

अमेरिकन टॉक शोमध्ये भारतातील स्टार सेलिब्रेटी झळकणार ही नेहमीच भारतीयांसाठी मानाची बाब आणि सेलिब्रेटींसाठी त्याचे स्टारडम किती मोठे आहे हे दाखविण्याची संधी असते. अमेरिकन टॉक शो चेलसी हॅंडलरस्‌ शोमध्ये शिल्पा शेट्टी झळकणार असल्याचे समजते आहे. या शो चा होस्ट चेलसी हॅंडलर नुकताच भारतात येऊन गेला. त्याने शोच्या दुसऱ्या सीझनसाठी भारतातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो शिल्पा शेट्टीच्या घरी पाहुणचाराला होता. फिटनेस फ्रिक शिल्पानेही त्याला अस्सल भारतीय पंजाबी ग्लुटेन फ्री आणि तेही घरी बनवलेले पदार्थ खाऊ घातले. मग काय... चेलसी महाराज खूश! शिल्पा आपल्या दोन आगामी चित्रपट आणि तिचे लग्न, फिटनेस तसेच तिच्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांना तिने कसे तोंड दिले याबाबात या शोमध्ये बोलणार आहे. या शोची वाट शिल्पाचे फॅन्स नक्कीच पाहत असणार. 

Web Title: Shilpa Shetty Kundra to feature in the second season of The Chelsea Handler Show