राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलाने पहिल्यांदाच फोटो केले पोस्ट

वियान कुंद्राने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले ३ फोटो
viaan raj kundra
viaan raj kundra

अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणी व्यावसायिक राज कुंद्राच्या Raj Kundra अटकेनंतर पत्नी व अभिनेत्री शिल्पा शेट्टीने Shilpa Shetty सोमवारी मौन सोडलं. सोशल मीडियावरील शिल्पाच्या पोस्टनंतर काही तासांनीच तिचा मुलगा वियानने Viaan Kundra इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. वियानने आई शिल्पा शेट्टीसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना त्याने कोणतेच कॅप्शन दिले नाही. आईला मिठी मारतानाचे, प्रेम व्यक्त करतानाचे हे फोटो आहेत. या फोटोंवर शिल्पाच्या 'हंगामा २' या चित्रपटातील सहकलाकार मिझान जाफरी याने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. वियानचा हा अकाऊंट व्हेरिफाइड नसला तरी राज कुंद्रा या अकाऊंटला फॉलो करत असून आपल्या अनेक फोटोंमध्ये त्याने या अकाऊंटला टॅग केले आहे. वियान नऊ वर्षांचा असून २०१२ मध्ये त्याचा जन्म झाला.

वियानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आई शिल्पाचं स्टेटमेंटसुद्धा शेअर केलं आहे. राज कुंद्राच्या अटकेच्या संपूर्ण प्रकरणावर शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मौन सोडलं होतं. 'मुंबई पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गांचा अवलंब करू. पण मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलांखातर तरी आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कोणाचाही विश्वासघात केला नाही,' असं शिल्पाने त्यात स्पष्ट केलं आहे.

viaan raj kundra
शिल्पा शेट्टीच्या बहिणीच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थार्पला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान राज कुंद्राचं नाव समोर आलं. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी हे जामिनावर मुक्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com