शिल्पाची वेलनेस सीरिज 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

अलीकडेच शिल्पाचं नाव फिटनेसशी जोडलं गेलंय. तिने खूप सारे फिटनेस व्हिडीओही आतापर्यंत शेअर केलेत. याला कारणही तसंच आहे. तिने नुकतंच "शिल्पा शेट्टी वेलनेस सीरिज' हे व्हेंचर लॉंच केलंय. सध्याचा कुल फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफच्या हस्ते हे लॉंच करण्यात आलं. या सीरिजचे तीन भाग असणार आहेत. एक भाग हा "आर्ट ऑफ लविंग फूड'चा असेल. ज्यामध्ये डाएट फूड आणि विविध रेसिपीज दिल्या जातील. दुसरा भाग हा "आर्ट ऑफ स्ट्रेथनिंग' म्हणजेच व्यायामाशी संलग्न असणार आहे. तर तिसऱ्या भागात "योग' दाखवला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तीनही भागात स्वतः शिल्पा आपले काही सिक्रेट शेअर करणार आहे.

अलीकडेच शिल्पाचं नाव फिटनेसशी जोडलं गेलंय. तिने खूप सारे फिटनेस व्हिडीओही आतापर्यंत शेअर केलेत. याला कारणही तसंच आहे. तिने नुकतंच "शिल्पा शेट्टी वेलनेस सीरिज' हे व्हेंचर लॉंच केलंय. सध्याचा कुल फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफच्या हस्ते हे लॉंच करण्यात आलं. या सीरिजचे तीन भाग असणार आहेत. एक भाग हा "आर्ट ऑफ लविंग फूड'चा असेल. ज्यामध्ये डाएट फूड आणि विविध रेसिपीज दिल्या जातील. दुसरा भाग हा "आर्ट ऑफ स्ट्रेथनिंग' म्हणजेच व्यायामाशी संलग्न असणार आहे. तर तिसऱ्या भागात "योग' दाखवला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तीनही भागात स्वतः शिल्पा आपले काही सिक्रेट शेअर करणार आहे. या सीरिजचे व्हिडीओ यू-ट्युब आणि फेसबुकवरही उपलब्ध असणार आहेत. याबद्दल शिल्पा सांगते, "माझं ध्येय हे स्वस्थ रहो, मस्त रहो हेच आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हे माझं कर्तव्य आहे. ही सीरिज म्हणजे माझ्या ध्येयपूर्तीची एक पायरी आहे. मी या क्षेत्रात एक्‍सपर्ट नाही. पण मला जेवढं शक्‍य आहे, तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन.' आता शिल्पाच्या या वेलनेस सीरिजमुळे अनेक तरुणींना फिट राहण्यासाठी योग्य तो सल्ला नक्कीच मिळेल. 
 

Web Title: shilpa shetty wellness series