'शिल्पाबाई आज प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही; नेटक-यांनी झापलं' 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

आजच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं शिल्पानं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे.

मुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या एका व्टिटवरुन ट्रोल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तिनं जे काही लिहिलं त्यावरुन तिला काय म्हणावे असा प्रश्न नेटक-यांनाही पडला. त्यांनी तिची चांगलीच कानउघाडणी केली आहे. शिल्पाला प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिन यातला फरक समजलेला  नाही. त्यामुळे तिनं तिचं ज्ञान सोशल माध्यमांवर दाखवून दिलं आहे.

कोरोनाचा धैर्यानं सामना करत आज देश मोठ्या आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तातडीनं पावले उचलली गेली आहेत. आजच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं शिल्पानं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. मात्र त्यात शिल्पानं प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वातंत्र्यदिन असे म्हटल्य़ाने तिला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागले आहे. शिल्पा सारख्या प्रख्यात अभिनेत्रीला प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिन यातला फरक समजू नये याचे वाईट वाटते. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आहेत.

आपल्यावर टीका होत आहे हे लक्षात आल्यावर तिनं ती चूक सुधारुन घेतली आहे. मात्र ट्रोलर्सनं शिल्पाला चांगलेच धारेवर धरले आहे. शिल्पानं असे म्हटले आहे की, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जगातील सर्वात मोठया लोकशाहीचा देश म्हणून आपल्या भारताकडे पाहिले जाते. त्यात सर्वात शेवटच्या घटकापर्यत संविधानाची समान मुल्ये पोहचली आहेत. अशाप्रकारे देश विकासाच्या वाटेवर आहे. मात्र त्यात प्रजासत्ताक ऐवजी स्वातंत्र्य दिन असा उल्लेख केला असल्यानं शिल्पाला बोलणी खावी लागली. त्यावेळी ट्रोलर्स कुठलीही भीड न बाळगता तिच्यावर कडवट शब्दांचा मारा सुरु केला. अखेर शिल्पानं माफी मागून तातडीनं आपली झालेली चूक दुरुस्त केली आहे. 

SP Balasubramanian;16 भाषा, 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गाणारा जादुई गायक

दुसरीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचा गदारोळ सुरु आहे. केंद्र सरकारनं शेतकरी विधेयक माघारी घ्यावे यासाठीचा लढा आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळ पासून शेतक-यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर शेतक-यांनी झेंडा फचकवून आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे दाखवून दिले होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशाप्रकारची घटना म्हणजे त्या दिवसाला गालबोट लागल्याचेही मत काही नेटीझन्सनं व्यक्त केलं आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Shetty writes Swatantrata Diwas in Republic Day tweet gets trolled