Bigg Boss : शिव-वीणामध्ये अबोला?

टीम ईसकाळ
सोमवार, 22 जुलै 2019

विकएंडच्या डावमध्ये शिवच्या एका चाहतीने सांगितले. तसंच महेश मांजरेकरांनीही दोघांची कानउघडणी केली. त्यामुळे ही गोष्ट मनावर घेऊन आता, दोघांनीही कॉन्संट्रेशनने खेळायचे ठरविले आहे.  

बिग बॉस मराठीमध्ये सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे शिव आणि वीणा... जिथे वीणा तिथे शिव... पण आता त्यांच्या एकत्र राहण्यावर काहीसा परिणाम होणार आहे. कारण त्या दोघांनी एकमेकांशी बोलायचे नाही, किंवा कमी बोलायचे ठरविले आहे.

Image result for shiv veena

बिग बॉसच्या सुरवातीपासून शिव आणि वीणाचं ट्यूनिंग चांगलं जमलं होतं. पण त्यांच्या या बॉण्डचा परिणाम थेट त्यांच्या टास्कवर आणि परफॉर्मन्सवर होऊ लागलाय असे विकएंडच्या डावमध्ये शिवच्या एका चाहतीने सांगितले. तसंच महेश मांजरेकरांनीही दोघांची कानउघडणी केली. त्यामुळे ही गोष्ट मनावर घेऊन आता, दोघांनीही कॉन्संट्रेशनने खेळायचे ठरविले आहे.  

मागील आठवड्यातील मर्डर मिस्ट्री या टास्कमध्ये शिवने वीणाचा टॉप फाडायला नकार दिला होता. हे असे करणे म्हणजे बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन आहे. यावरून महेश मांजरेकर व अभिजीत केळकर या दोघांनीही शिवला खडे बोल सुनावले होते. त्यामुळे आता शिव-वीणा खरंच बोलणं सोडून देणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv and Veena are not talking with each other in bigg boss