'भाऊ आहे मोठा, खर्चाला नाय तोटा! शिवनं एका फटक्यात घेतली अलिशान गाडी| Shiv Thackare new car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare Bigg Boss new Harrier viral photo social

Shiv Thackare : 'भाऊ आहे मोठा, खर्चाला नाय तोटा! शिवनं एका फटक्यात घेतली अलिशान गाडी

Bigg Boss Fame Shiv Thakare Buys A Luxury Car : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या स्पर्धकांमध्ये शिव ठाकरेचे नाव घेता येईल. तो आणि रॅपर एम सी स्टॅन यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा होती. अखेर प्रेक्षकांच्या मताधिक्क्यावर एम सी स्टॅन विजेता झाला.

लाखो चाहत्यांच्या मनात शिव ठाकरेचं नाव होतं त्यानं त्याच्या व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांना आणि चाहत्यांना भारावून टाकलं होतं. शिव ठाकरे बिग बॉसमध्ये उपविजयी झालेल्या शिवला सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिव हा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आता त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय आहे.

Also Read - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

शिवनं आता एक अलिशान कारची खरेदी केली आहे. त्यानं ते फोटो व्हायरल करताच त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉसच्या शिवनं चाहत्यांना ही गुड न्युज दिल्यानंतर चाहत्यांनी त्याला दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. आमच्या लाडक्या शिवला खूप साऱ्या शुभेच्छा. तू आम्हाला खूप निखळ आनंद दिला आहे. तुझ्या पुढील प्रवासाला शुभेच्छा. असे म्हटले आहे.

इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या फोटोला आतापर्यत लाखो व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत. शिवनं खरेदी केलेल्या अलिशान कारची किंमत ही ३० लाख एवढी आहे. कार शो रुमच्या बाहेरुन त्यानं नव्या कारचे फोटो व्हायरल केले आहेत.

इ टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, शिवनं त्याच्या कमाईतून ही गाडी खरेदी केली आहे. यावेळी त्यानं पिंक सुटमध्ये शेयर केलेले फोटो चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या कमेंटसचा विषय आहेत. भलेही मी मर्सिडिज घेतली नसेल पण मी घेतलेली गाडी ही माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे.