Shiv Thakare: 'मी मरेपर्यंत', एमसी स्टॅन अन् अब्दूच्या वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया | MC Stan News | Big Boss 16 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv thakareAbdu Rozik Expressed His Anger On Mc Stan

Shiv Thakare: 'मी मरेपर्यंत', एमसी स्टॅन अन् अब्दूच्या वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया

'बिग बॉस 16' चा सिझन संपला असला तरी आजही त्या सिझनच्या स्पर्धकांची चर्चा रंगत आसते. या सिझनंमध्ये गाजली ती फक्त मंडलीची मैत्री. त्याच्यापुढे कोणीही टिकू शकले नाही. घरातील या सहा लोकांच्या मंडलीने प्रेक्षकांच भरपुर मनोरंजन केलं.

या मंडलीमध्ये, अब्दु रोजिक, साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निम्रित कौर अहलुवालिया आणि सुंबूल तौकीर खान यांचा समावेश आहे.

त्याची मैत्री आपण घराबाहेरही पाहत आहोत. अनेक कार्यक्रमात ते एकत्र हजेरी लावतात. मात्र आता या मंडलीत फुट पडल्याच्या बातम्या समोर आल्या येत आहेत.

एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचे कळत आहे. यावर अब्दू रोजिकने एमसी स्टॅनला धारेवर धरलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर मंडलीचा महत्वाचा माणुस म्हणजेच शिव ठाकरेने त्यांची प्रितिक्रिया दिली आहे.

आता याप्रकरणी शिव ठाकरेने सांगितले आहे की अब्दू आणि एमसी स्टॅन यांच्यातील भांडणाच्या बातम्या ऐकून तो ही आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाला आहे. त्याला वाटलं हे कधी झालं? तो दोघांशी बोलला आहे.

त्यांनतर तो म्हणला की असं काही झालेलं नाही. हा फक्त एक छोटासा गैरसमज आहे. भेटल्यावर अनेक गोष्टी घडतात. काहीही बिनसलेलं नाही. आम्ही तयार केलेल्या मंडलीत सर्वजण बोलत आहेत. त्यात आम्ही एकमेकांचे पायही खेचत असतो.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

त्याचबरोबरशिव ठकारेने दावा केला की, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो आपली मंडळी फुटू देणार नाही. तो म्हणाला की 'छोट्या गोष्टी झाल्या तरी मंडली तुटणार नाही. असे काही घडले नाही. लवकरच पुढील गेट-टूगेदर देखील होईल.

टॅग्स :Big BossviralShiv Thakare