Shiv Thakare: बिग बॉस फेम शिव ठाकरेंनं घेतली नवी गाडी.. व्हिडिओ व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare buys a new car after Bigg Boss 16 show

Shiv Thakare: बिग बॉस फेम शिव ठाकरेंनं घेतली नवी गाडी.. व्हिडिओ व्हायरल..

Shiv Thakare new car: शिव ठाकरे हे नाव माहीत नसेल असं कुणीही नाही. कारण गेल्या काही वर्षात मनोरंजन विश्वात विशेष करून टेलिव्हिजन वर हे नाव सातत्याने घेतलं जात आहे. त्यामुळे शिव ठाकरे आता घराघरातच नाही तर मनमनात पोहोचला आहे.

एम टिव्ही 'रोडीज' मधून आलेला हा अमरावतीचा शिव ठाकरे बघता बघता तरूणांना भुरळ घालून गेला. मग त्याने बिग बॉस मराठी गाजवलं आणि जिंकलंही. तिथे त्याचं आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचं प्रेमप्रकरण हा मोठा चर्चेचा विषय झाला, आणि पुढे दोघेही वेगळे झाले.

मग त्याने नुकत्याच झालेल्या बिग बॉस हिंदीच्या 16 व्या पर्वात सहभाग घेतला आणि त्याचे चाहते देशभरात पसरले. टॉप 2 स्पर्धकांमध्ये शिवचा समावेश झाला. या पर्वातून शिव ची एक वेगळी ओळख समोर आली. आता शिवने आपल्या चाहत्यांना पुन्हा एक गूड न्यूज दिली आहे.

(Shiv Thakare buys a new car after Bigg Boss 16 show)

शिवनं नुकतीच एक नवी गाडी विकत घेतली आहे. या आलीशान गाडीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की शिव आपल्या गाडीचा कव्हर काढतो, गाडीच्या पाया पडतो. प्रेमाने गाडीचे चुंबन घेतो. प्रत्येकाला आपली गाडी किती महत्वाची आणि जिव्हाळ्याची असते हे शिवच्या व्हिडिओतून दिसते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

शिवने घेतलेली टाटा कंपनीची 'हॅरीयर' गाडी असून याची किंमत अंदाजे 25 लाख रुपये आहे. या गाडीची शिव पूजा करतो गाडीपुढे नारळ वाढवतो. त्यानंतर सर्वांना प्रसाद देतो आणि मग गाडी घेऊन रस्त्यावर उतरतो. यावेळी शिवचे फोटो टिपण्यासाठी त्याचे चाहते आणि पापाराजी यांनी गर्दी केली होती. शिवची ही नवी गाडी आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

टॅग्स :Shiv Thakare