
Shiv Thakare : 'तिच्यासारखी मुलगी...' शिवनं आकांक्षासोबतच्या नात्यावर केला धक्कादायक खुलासा!
Shiv Thakare Khatron ke khiladi interview : बिग बॉसच्या सोळाव्या सीझनमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेनं लक्ष वेधून घेतले होते. एम सी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यात जोरदार लढत झाली. त्यात भलेही बाजी स्टॅननं मारली पण चाहत्यांमध्ये क्रेझ ही शिवचीच असल्याचे दिसून आले. मराठी बिग बॉसचा विजेता असलेल्या शिवसाठी हिंदी बिग बॉस मोठं प्लॅटफॉर्म होतं. त्यामध्ये त्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
शिव हा आता खतरो के खिलाडीच्या १३ व्या सीझनमध्ये दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यासाठी त्यानं तयारी देखील सुरु केली आहे. शिवनं गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या नावाची सोशल मीडियावर देखील मोठी चर्चा असल्याचे दिसून आले आहे. शिवच्या नावाभोवती एवढी मोठी फेम असताना आणि त्याच्या वाट्याला दोन मराठी चित्रपटांची संधी आली असताना त्यानं मोठा निर्णय घेतल्याचे दिसून आले.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
शिवचा संघर्ष मोठा आहे. त्यानं आता जे स्थान आणि ग्लॅमर मिळवले आहे त्यामागे त्याची मोठी मेहनत आहे. यासगळ्यात शिव हा आता बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडीमध्ये दिसणार आहे. एका मुलाखतीमध्ये आपल्याला नेमका कसला फोबिया आहे याविषयी सांगितलं होतं. तसेच आकांक्षासोबतच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. काही दिवसांपासून शिव आणि आकांक्षाच्या रिलेशनशिपची चर्चा होताना दिसते आहे.
शिव म्हणतो, खतरो के खिलाडीमध्ये मी खूप प्रेशर घेत होतो. त्याचा परिणाम माझ्या कामगिरीवर झाला असून माझे मोटिव्हेशन बदलले. पण खतरो के खिलाडी के केवळ माझेच स्वप्न राहिलेले नाही तर ते माझ्या चाहत्यांचे देखील झाले आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. ते मला अधिक प्रेरणा देणारे आहे. काही करुन मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. अशी प्रतिक्रिया शिवनं दिली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवनं खतरो के खिलाडीसाठी दोन मराठी चित्रपट सोडल्याचे दिसून आले आहे. शिवनं त्याच्या फोबियाविषयी सांगितले आहे. त्याचे काय आहे की, मी बऱ्याचशा गोष्टींना घाबरतो. ते पाणी असो किंवा वाघ, सापाची देखील भीती वाटते. पण असे असले तरी मी काही हार मानणारा नाही. असे शिवनं म्हटले आहे.