बिग बॉस नंतर Shiv Thakare ला भेटायला आलेल्या प्रत्येक फॅनसाठी शिवची आई करायची 'ही' खास गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare, Shiv Thakare news, Shiv Thakare mother, shiv thakare kkk 13,

बिग बॉस नंतर Shiv Thakare ला भेटायला आलेल्या प्रत्येक फॅनसाठी शिवची आई करायची 'ही' खास गोष्ट

Bigg Boss 16 Fame Shiv Thakare News: बिग बॉस १६ मुळे शिव ठाकरे प्रसिद्धीच्या झोतात आला. शिव ठाकरेने बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं. शिव ठाकरेची बिग बॉस नंतर चांगलीच हवा झालीय.

शिवच्या फॅन फॉलोईंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. इतकंच नव्हे तर बिग बॉस झाल्यावर शिव जेव्हा अमरावतीला गेला तेव्हा त्याला भेटायला टेम्पोतून माणसं यायची. त्यावेळी शिवची आई एक खास गोष्ट करायची ज्यामुळे शिवला आईचा अभिमान आहे.

(Shiv thakare mother used to do 'this' special thing for every fan who came to meet Shiv Thakare after Bigg Boss 16)

शिव ठाकरे जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीशी बोलतो आणि त्याच्या फॅन्सची सेल्फीची हौस पुरी करतो.

त्याबद्दल स्पष्टीकरण देताना शिव म्हणाला, “बिग बॉस 16 जिंकल्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक मला भेटायला यायचे आणि माझी आई त्यांना थांबून जेवून जाण्याचा आग्रह करायची.

आमचं घर लहान होतं, ते माणसांनी भरलं होतं आणि त्यांना बसायला आणि खायला जागा नव्हती, पण मी माझ्या आईला सलाम करतो."

शिव ठाकरे पुढे लिहितो, "या सर्व फॅन्ससाठी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यात बसून लोकांना जेवण दिलं. या सर्वांसाठी आईने स्वतः स्वयंपाक केला. जेव्हा मी तिला विचारले की तू हे सर्व का करत आहेस.

या सर्व गोष्टी करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, तेव्हा ती म्हणाली की ज्यांनी नेहमीच तुला पाठिंबा दिला त्यांना कधीही विसरु नको आणि त्यांच्यासाठी योग्य वेळ काढत राहा." अशाप्रकारे आईचे शब्द शिवच्या मनावर कायमचे कोरले गेले.

बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे यांनी एमटीव्ही रोडीज रायझिंग सीझन 14 मध्ये देखील भाग घेतला आहे.

अमरावती येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, शिव, जो एक इंजिनियर देखील आहे, 2019 मध्ये मराठी टेलिव्हिजनवर टाइम्स ऑफ इंडियाच्या टॉप 15 मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये प्रथम क्रमांकावर होता.

बिग बॉस १६ मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेने स्वतःची छाप पाडली आणि उपविजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं.