इतक्‍यात नाही लगीनघाई 

संकलन : भक्ती परब 
गुरुवार, 16 मार्च 2017

"इतक्‍यात नाही लगीनघाई', असं म्हणतेय खुद्द नायरा. अहो तीच, बरोबर ओळखलंत. सिंघानिया खानदानाची मोठी मुलगी म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री शिवांगी जोशी. जिचा लग्नसोहळा गेला आठवडाभर सुरू आहे. नायरा आणि कार्तिकचा हा लग्नसोहळा छोट्या पडद्यावर खूपच मोठा मानला जात आहे. बिकानेरला रियल लोकेशनवर शूट झालेला बहुधा हा पहिलाच सोहळा असेल. "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' ही मालिका अक्षरा आणि नैतिक सोडून गेल्यावर मालिकेत नायरा आणि कार्तिकच्या जोडीला मुख्य जोडीचा दर्जा दिला गेला. तेव्हापासून नायरा-कार्तिकच्या जोडीने सोशल मीडियावर आपल्या प्रेमरंगाने अनेकांना वेड लावलंय.

"इतक्‍यात नाही लगीनघाई', असं म्हणतेय खुद्द नायरा. अहो तीच, बरोबर ओळखलंत. सिंघानिया खानदानाची मोठी मुलगी म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री शिवांगी जोशी. जिचा लग्नसोहळा गेला आठवडाभर सुरू आहे. नायरा आणि कार्तिकचा हा लग्नसोहळा छोट्या पडद्यावर खूपच मोठा मानला जात आहे. बिकानेरला रियल लोकेशनवर शूट झालेला बहुधा हा पहिलाच सोहळा असेल. "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' ही मालिका अक्षरा आणि नैतिक सोडून गेल्यावर मालिकेत नायरा आणि कार्तिकच्या जोडीला मुख्य जोडीचा दर्जा दिला गेला. तेव्हापासून नायरा-कार्तिकच्या जोडीने सोशल मीडियावर आपल्या प्रेमरंगाने अनेकांना वेड लावलंय. शिवानीबरोबर कार्तिकची भूमिका करणारा मोहसीन खान तर खरोखरीच तिच्या प्रेमात पडलाय. त्यानंतर दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुलीही दिलीय. तर सांगायचा मुद्दा हा, की आता मालिकेत त्यांचं दोघांचं इतकं थाटामाटात लग्न झालं म्हटल्यावर कोणीही विचारेलच ना, की आता खरंखुरं लग्न कधी करताय? पण त्यावर शिवांगी जोशी म्हणाली, "खऱ्या आयुष्यात लग्न? छे छे! मला नाही करायचं इतक्‍या लवकर लग्न. मी आपली मालिकेच्या शूटिंगचा मस्त आनंद घेतेय. त्यामुळे मी लवकरच लग्न करीन हा विचारसुद्धा मनात आणू नका. शूटिंगमुळे गेले 20 दिवस मी सेटवर वधूचा पोशाख घालून फिरतेय आणि पाठवणीच्या सीनच्या वेळेस खूप रडण्याची ऍक्‍टिंगही करावी लागलीय. लग्नसोहळ्याचा खराखुरा अनुभव मी सध्या सेटवरच घेतेय. तेच पुरे झालंय . त्यामुळे मला लग्न करून संसार थाटण्याची अजिबात घाई नाहीय. पण माझ्या खऱ्या लग्नात मी एवढी रडणार नाहीय, हे आत्ताच ठरवून टाकलंय.' बरं बाई, राहिलं मग. शिवानीच्या या मालिकेत लग्नसोहळ्यामुळे दोन चांगल्या गोष्टी घडल्यात. एक तर तिला लग्नाचा अनुभव मिळाला आणि आता मालिकेचा टीआरपीही वाढेल... 
 

Web Title: shivani joshi ye rishta kya kehlata hai