श्रद्धा-फरहान पुन्हा एकत्र 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर "रॉक ऑन 2'च्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले. त्यानंतर त्यांच्यातील प्रेमप्रकरणाच्या बातम्या व्हायरल झाल्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चाही रंगल्या.

खरं-खोटं माहीत नाही; पण त्यानंतर फरहानचा घटस्फोट झाल्याने त्याची ब्रेकिंग न्यूज झाली. "रॉक ऑन 2'नंतर श्रद्धा मोहित सुरीच्या चित्रपटात काम करणार असून, त्यात फरहान तिचा हिरो असेल, अशीही चर्चा रंगली होती.

श्रद्धाने या आधी "आशिकी 2'साठी मोहितबरोबर काम केलंय. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला हॉलीवूडपट "चॅम्प'चा मोहित रिमेक करतोय आणि त्यात त्याच्या आयुष्यातीलही काही प्रसंग दाखविण्यात येणार आहेत, अशी चर्चा आहे. श्रद्धाचा "हसिना-द क्वीन ऑफ मुंबई' चित्रपट 18 ऑगस्टला प्रदर्शित होईल. त्यात पुन्हा एकदा श्रद्धा आणि फरहानची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. साहजिकच त्यांच्या प्रेमाची चर्चा नव्याने रंगेल...  

Web Title: Shraddha-Farhan again work in movie