बायोपिकमध्ये श्रद्धा 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

श्रद्धा कपूरचा नुकताच "ओके जानू' चित्रपट प्रदर्शित झाला. रसिकांचाही त्याला ओकेच प्रतिसाद मिळाला. तिच्या "रॉक ऑन 2'ची मैफीलही बेसूर ठरली. सध्या ती अर्जुन कपूरबरोबर "हाफ गर्लफ्रेंड' आणि सिद्धार्थ कपूरबरोबर "हसिना-द क्वीन ऑफ मुंबई' चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यात भर पडलीय ती अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या "मुगल' चित्रपटाची. गुलशन कुमार यांच्या जीवनावर तो आधारीत आहे. अक्षय त्यात गुलशन कुमार यांची भूमिका करतोय. अनुराधा पौडवाल यांची भूमिका श्रद्धा करणार असल्याची चर्चा रंगलीय. श्रद्धाची निवड होण्याचं कारण म्हणजे तिची गायकी. ती उत्तम अभिनयाबरोबरच चांगलं गातेही.

श्रद्धा कपूरचा नुकताच "ओके जानू' चित्रपट प्रदर्शित झाला. रसिकांचाही त्याला ओकेच प्रतिसाद मिळाला. तिच्या "रॉक ऑन 2'ची मैफीलही बेसूर ठरली. सध्या ती अर्जुन कपूरबरोबर "हाफ गर्लफ्रेंड' आणि सिद्धार्थ कपूरबरोबर "हसिना-द क्वीन ऑफ मुंबई' चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यात भर पडलीय ती अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या "मुगल' चित्रपटाची. गुलशन कुमार यांच्या जीवनावर तो आधारीत आहे. अक्षय त्यात गुलशन कुमार यांची भूमिका करतोय. अनुराधा पौडवाल यांची भूमिका श्रद्धा करणार असल्याची चर्चा रंगलीय. श्रद्धाची निवड होण्याचं कारण म्हणजे तिची गायकी. ती उत्तम अभिनयाबरोबरच चांगलं गातेही. त्याची अनुभूती तिने तिच्या "आशिकी 2', "एक व्हिलन', "रॉक ऑन 2' आदी चित्रपटांतून दिली आहे. ती चांगली गात असल्यानेच तिची "आशिकी 2' आणि "रॉक ऑन 2' चित्रपटांमध्ये निवड झाली होती. अनुराधा पौडवाल यांनी गुलशन कुमार यांच्याबरोबर अनेक अल्बम केले. अनेक भक्तिगीते गायली. त्यामुळे त्यांचा गुलशन कुमार यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा वाटा आहे. त्यांची महत्त्वाची भूमिका श्रद्धा करणार आहे. "मुगल' चित्रपटात गुलशन कुमार यांच्या सुरुवातीपासूनच्या जीवनापासून ते शेवटपर्यंतच्या प्रवासातील काही प्रसंग अधोरेखित केले जाणार आहेत. 2018 मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.  

Web Title: Shraddha Kapoor roll as Anuradha Paudwal