
Shradha Kapoor : 'पुण्यात आली मिसळ खाऊन गेली!' श्रद्धाची जंगी मिरवणूक
Shradha Kapoor Bollywood Actress Pune Visit : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं लाखो चाहत्यांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरचे नाव घ्यावे लागेल. सध्याच्या घडीला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. मोठ्या प्रतिक्षेनंतर श्रद्धाचा एक नवा कोरा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या प्रमोशनसाठी श्रद्धा पुण्यात आली होती. त्यावेळी चाहत्यांच्या उत्साहाला भरते आले होते.
श्रद्धा पुण्यात आल्याचे कळताच तिच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पुण्यातील प्रसिद्ध मिसळचा तिनं आनंद घेतला. यावेळी तिनं माध्यमांशी, चाहत्यांशी संवाद साधला. तिला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर श्रद्धाही हरखून गेल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर देखील त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. श्रद्धानं तिचा व्हॅलेंटाईन डे पुण्यात साजरा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
श्रद्धा कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे यात शंका नाही. अलीकडेच, श्रद्धाचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने पुणेकरांना भेट दिली. अशातच, व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस सेलिब्रेट केला. याशिवाय तिनं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरही दिली आहेत.

Shradha Kapoor
श्रद्धानं पुण्यातील प्रसिद्ध मिसळचा आनंद घेत नव्या चित्रपटाविषयीच्या काही गोष्टींना उजाळा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाच्या प्रदर्शनाची दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.
तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.त्याचं कौतूकही त्यांनी केलं आहे.