श्रेयसचं पुन्हा ‘वेलकम...’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो. आजवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट करून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो. आजवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट करून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता लवकरच तो एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेलकम टू बजरंगपूर’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम टू सज्जनपूर’ या फ्रेंचाइजीचा असणार आहे. या चित्रपटात श्रेयससोबत अभिनेत्री अमृता राव मुख्य भूमिकेत होती. आता ‘वेलकम टू बजरंगपूर’ या चित्रपटात श्रेयससोबत अभिनेता अरबाज खानची प्रियसी जॉर्जिया ऐंड्रियानी असणार आहे. या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे अमृतानंतर श्रेयसची जॉर्जियासोबतची केमिस्ट्री कशी असणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shreyas comeback in bollywood