श्रेयस आणि दिप्तीला मिळाली एक्स्प्रेस भेट!

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सगळीकडेच आनंदी वातावरण आहे. कंदील, पणत्या अंगणात दिसायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमात आणि मालिकेमध्ये देखील दिवाळीची तयारी जोरात सुरु झालेली आहे. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या मंचावर लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या लाडक्या श्रेयस तळपदेने नुकतीच हजेरी लावली. श्रेयसने आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. पण, या कार्यक्रमामध्ये आलेल्यावर कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी श्रेयसचे मन जिंकले. या विनोदवीरांच्या स्कीटसने श्रेयसला पोट धरून हसण्यास भाग पाडले. मंचावर श्रेयसने बरीच धम्माल मस्ती केली. .

मुंबई : सगळीकडेच आनंदी वातावरण आहे. कंदील, पणत्या अंगणात दिसायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमात आणि मालिकेमध्ये देखील दिवाळीची तयारी जोरात सुरु झालेली आहे. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या मंचावर लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या लाडक्या श्रेयस तळपदेने नुकतीच हजेरी लावली. श्रेयसने आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. पण, या कार्यक्रमामध्ये आलेल्यावर कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी श्रेयसचे मन जिंकले. या विनोदवीरांच्या स्कीटसने श्रेयसला पोट धरून हसण्यास भाग पाडले. मंचावर श्रेयसने बरीच धम्माल मस्ती केली. .

कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या मंचावर या दिवाळी विशेश आठवड्यामध्ये श्रेयस तळपदे बरोबरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशोक हांडे, शरद उपाध्ये आणि सुप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर. एकूणच या संपूर्ण आठवड्यामध्ये  प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे हे नक्की. लक्ष्मीपूजनच्या दिवशी महाराष्ट्राचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेने मंचावर हजेरी लावली. या मंचावर त्याला एक नाही तर दोन सरप्राईझ मिळाले. एक म्हणजे श्रेयसची पत्नी दिप्तीला देखील कार्यक्रमामध्ये बोलावण्यात आले. या दोघांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच कलर्स मराठी आणि कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या टीमच्या वतीने त्यांना त्यांच्या फोटोचे स्केच भेट म्हणून देण्यात आले जे त्यांना खूप आवडले. श्रेयसला किशोर चौघुले यांचा पक्या भाईंचे स्कीट खूप आवडले तसेच संदीप गायकवाड यांनी अजय देवगण, अक्षय कुमार आणि नसिरुद्दीन शहा यांची केलेली मिमिक्री विशेष आवडली आणि मी अजय देवगन यांनी या स्कीट बद्दल नक्कीच सांगेन असा शब्द दिला.
 
या मंचावर समीर चौघुले यांनी त्यांची श्रेयस बरोबर असलेली एक विशेष आठवण देखील शेअर केली. समीर आणि श्रेयस कॉलेजमध्ये असताना, एका प्रतीयोगीतेमध्ये श्रेयसला द्वितीय तर समीरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता असे पुरस्कार मिळाले होते ज्याचं वृत्तपत्रामध्ये आलेलं कात्रण अजूनही समीर चौघुलेकडे आहे आणि ते कात्रण तो आपल्या मुलाला नेहेमी दाखवतो. हे ऐकून श्रेयसला कॉलेजचे दिवस आठवले आणि त्याने समीरला सांगितले माझ्यासाठी तू तेंव्हाही उत्तम अभिनेता होतास आणि अजूनही आहेस, हे ऐकून समीर खूप भारावून गेला.
 
असे अनेक किस्से, आठवणी आणि मज्जा बघण्यासाठी बघा कॉमेडीची GST एक्सप्रेसचा दिवाळी विशेष आठवडा कलर्स मराठीवर सोम ते गुरु रात्री ९.०० वा.
 

Web Title: shreyas talpade dipti talpade at comedychi gst express esakal news