श्रेयस करणार दिग्दर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित चेहरा म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे.

मुंबई : हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित चेहरा म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे. श्रेयसने अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले. ‘पोस्टर बॉईज’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट. या चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळला आहे.

‘सरकार की सेवा में’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी श्रेयसने पेलली आहे. यामध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारतानाही दिसणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला कॉमेडी टचही देण्यात आला आहे. श्रेयसबरोबरच सुधीर पांडे, श्रद्धा जयस्वाल, अनिल चरणजीत आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

हरिहरन अय्यर आणि राज भट्टाचार्य निर्मित या चित्रपटाचा बराचसा भाग उत्तर प्रदेशमधील छोट्या-छोट्या गावांमध्ये चित्रीत केला जाणार आहे. पुन्हा एकदा श्रेयस दिग्दर्शक म्हणून सफल ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

web title : Shreyas will do Direction 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shreyas will do Direction