Sridevi-Boney Kapoor Anniversary: पाहता क्षणी प्रेमात अन् प्रेमासाठी पाठलाग, या जोडप्याची लव स्टोरी फारच खास

या जोडप्याची प्रेमकहाणी बी टाऊनमधे एके काळी चित्रपटासारखी हिट झाली होती.
Sridevi-Boney Kapoor Anniversary
Sridevi-Boney Kapoor Anniversaryesakal

गेल्या अनेक दशकांत बॉलीवुडमधून अनेक जोडपी बाहेर पडली आहेत.त्यांच्या प्रेम कहाण्या प्रेक्षकांच्या मनात छाप सोडणाऱ्या आहेत.हेमा मालिनी-धर्मेंद्र असो किंवा अमिताभ आणि जया बच्चन.चाहत्यांनी कायमच यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय.बॉलीवुडमधलं(Bollywood) आणखी एक प्रसिद्ध जोडपं म्हणजे श्रीदेवी आणि बोनी कपूर.त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस.या जोडप्याची प्रेमकहाणी 'बी टाऊन'मधे एके काळी चित्रपटासारखी हिट झाली होती.

आधीच मोना कपूरशी लग्न झालेल्या बोनी कपूरला श्रीदेवीमधे त्याचा जीवनसाथी झळकला.७० च्या दशकात श्रीदेवीला पहिल्यांदाच पदड्यावर बघून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडला होता.ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.तामिळ चित्रपटात पहिल्यांदा बघताच,'हीच ती व्यक्ती जी माझ्या चित्रपटात मला हवी आहे.'(Film Maker)असे बोनी मनातल्या मनात बोलला होता.

श्रीदेवीला बघितल्यानंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपटासाठी तिलाच घेण्यावर बोनी कपूरचे ठाम मत होते.त्यांची पहिली भेटही चित्रपटाच्या सेटवर झाली होती.त्यावेळी बोनी कपूर श्रीदेवीच्या तुटक हिंदी आणि इंग्रजी भाषेने प्रभावित झाला होता.खरं तर बोनी कपूरने श्रीदेवीला सर्वोत्तम मेकअप रूम, सर्वोत्तम पोशाख देऊन त्याचं श्रीदेवीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता.एवढेच नव्हे तर बोनी कपूरने स्वित्झरलँपर्यंत तीचा पाठलागही केला होता.

हळूहळू श्रीदेवीलाही बोनीचे प्रयत्न लक्षात आले आणि तिच्या मनात त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्या.एका मुलाखतीत श्रीदेवीने सांगितले होते की,ती जितके बोनी कपूरबद्दल जाणून घेत गेली तितकीच ती त्याच्या प्रेमात पडत गेली.

Sridevi-Boney Kapoor Anniversary
बोनी कपूर यांनी शेअर केला श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडीओ...

या जोडप्याला लग्नबंधनात अडकण्याआधी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.अखेर २ जून १९९६ रोजी या जोडप्याने लग्न केले.या जोडप्याला दोन मुली आहेत.श्रीदेवी आज हयात नसली तरी श्रीदेवी आणि बोनी कपूरची जोडी आजही बॉलीवुडमधे तेवढीच आठवली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com