ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर

रविवार, 24 सप्टेंबर 2017

नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अशी माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या बुधवारी (दि.२७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे : नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अशी माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या बुधवारी (दि.२७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे दर वर्षी दिला जातो. यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, डॉ. रघुनाथ माशेलकर, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, किशोरी आमोणकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. विजय भटकर, लीला पुनावाला यांच्यासह मान्यवरांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार उल्हास पवार, वास्तु विशारद महेश नामपूरकर, माजी आमदार मोहन जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: shriram lagoo maharshi award pune esakal news