श्रिया आता झळकणार वेबसीरीजमध्ये

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

श्रिया पिळगावकर हे नाव आता मराठीसह हिंदी सिनसृष्टीला नवं नाही. एकुलती एक या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर मराठीत हा चेहरा दिसला नाही. पण हिंदीत मात्र तिने हळूहळू वाटचाल सुरू केली. शाहरूख खानच्या फॅनमध्ये ती झळकली आणि तिच्या करिअरला जोरदार झळाळी मिळाली. त्यानंतर श्रिया सातत्याने नवंनवे प्रयोग करते आहे. 

मुंबई : श्रिया पिळगावकर हे नाव आता मराठीसह हिंदी सिनसृष्टीला नवं नाही. एकुलती एक या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर मराठीत हा चेहरा दिसला नाही. पण हिंदीत मात्र तिने हळूहळू वाटचाल सुरू केली. शाहरूख खानच्या फॅनमध्ये ती झळकली आणि तिच्या करिअरला जोरदार झळाळी मिळाली. त्यानंतर श्रिया सातत्याने नवंनवे प्रयोग करते आहे. 

आता ती लवकरच वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरीजचं नाव मिर्झापूर असं असून तिच्यासोबत असणार आहे अली फजल. ही वेबसीरीज नेमकी कशावर असणार आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही. पण हा एक गॅंगस्टर ड्रामा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची निर्मिती असलेल्या या सीरीजमध्ये पंकज त्रिपाठीही असणार आहेत. याबद्दल बोलताना श्रिया म्हणाली, मिर्झापूरमध्ये मी काम करतेय हे माझ्यासाठी खूप कुतूहलाचं असणार आहे. आम्ही या वेबसीरीजच्या शूटला सुरूवातही केली आहे. सध्या याचं शूट वाराणसीला सूरू आहे. मी आजवर जे काही काम केलंय त्यापेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. अली आणि मी काॅलेजपासूनचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे एकत्र काम करायला आणखी मजा येतेय.'

Web Title: shriya pilgaonkar now in web mirzapur ali fazal esakal news