'संघमित्रा'मधून श्रुती बाहेर 

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

अभिनेत्री श्रुती हसनने नुकतंच "कान्स' चित्रपट महोत्सवात आगामी चित्रपट "संघमित्रा'चं जोरदार प्रमोशन केलं; मात्र आता ती या चित्रपटातून बाहेर पडल्याचं बोललं जातंय. ही माहिती खुद्द चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरद्वारे दिलीय. "श्रुती आता "संघमित्रा' चित्रपटाचा हिस्सा नाही,' असं ट्विट त्यांनी नुकतंच केलंय. श्रुतीच्या निकटवर्तीने दिलेली माहिती मात्र वेगळीच आहे. "श्रुती स्वत:च चित्रपटातून बाहेर पडलीय,' असं त्यांचं म्हणणं आहे. श्रुती "संघमित्रा' चित्रपटात एका योद्‌ध्याची भूमिका साकारणार होती. त्यासाठी तिने लंडनमध्ये तलवारबाजी व मार्शल आर्टस्‌चे धडेही गिरविले होते.

अभिनेत्री श्रुती हसनने नुकतंच "कान्स' चित्रपट महोत्सवात आगामी चित्रपट "संघमित्रा'चं जोरदार प्रमोशन केलं; मात्र आता ती या चित्रपटातून बाहेर पडल्याचं बोललं जातंय. ही माहिती खुद्द चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरद्वारे दिलीय. "श्रुती आता "संघमित्रा' चित्रपटाचा हिस्सा नाही,' असं ट्विट त्यांनी नुकतंच केलंय. श्रुतीच्या निकटवर्तीने दिलेली माहिती मात्र वेगळीच आहे. "श्रुती स्वत:च चित्रपटातून बाहेर पडलीय,' असं त्यांचं म्हणणं आहे. श्रुती "संघमित्रा' चित्रपटात एका योद्‌ध्याची भूमिका साकारणार होती. त्यासाठी तिने लंडनमध्ये तलवारबाजी व मार्शल आर्टस्‌चे धडेही गिरविले होते. त्यामुळे ती चित्रपटाबाबत फारच उत्सुक होती; मात्र तिला फायनल स्क्रिप्टही दिली गेली नाही आणि शूटिंगचं शेड्युलही... "कान्स' चित्रपट महोत्सवात "संघमित्रा'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा श्रुती म्हणाली होती, की मी "संघमित्रा' चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मग, आता मध्येच तिने चित्रपट का सोडला हे कुणालाच ठाऊक नाही. श्रुतीची जागा कोण घेतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

Web Title: Shruti Haasan walks out of ‘Sanghamitra’