शुभांगी अत्रे होणार वधू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील भाभीजी ऊर्फ अभिनेत्री शुभांगी अत्रे अनेकांच्या दिल की धडकन. मालिकेतील आगामी भागात ती वधूच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तिने या विवाह सोहळ्यासाठी स्वत:च्या लग्नातील लेहंगा वापरण्याचा निर्णय घेतला. आपल्या विवाहाचा पोशाख पुन्हा एकदा परिधान करायला मिळणार असल्यामुळे ती खूपच खूश आहे. शुभांगी म्हणाली, ‘माझ्या लग्नातील लेहंगा खूप आवडतो. तो पुन्हा परिधान करण्याची संधी कधी मिळेल याचा मी विचार करायचे. सुदैवाने संधी मिळाली. यासाठी मी ‘ॲण्ड टीव्ही’चे आभार मानते. त्यांनी मला विवाह दृश्‍यात माझा विवाह पोशाख परिधान करायला मंजुरी दिली हे आनंददायी आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील भाभीजी ऊर्फ अभिनेत्री शुभांगी अत्रे अनेकांच्या दिल की धडकन. मालिकेतील आगामी भागात ती वधूच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तिने या विवाह सोहळ्यासाठी स्वत:च्या लग्नातील लेहंगा वापरण्याचा निर्णय घेतला. आपल्या विवाहाचा पोशाख पुन्हा एकदा परिधान करायला मिळणार असल्यामुळे ती खूपच खूश आहे. शुभांगी म्हणाली, ‘माझ्या लग्नातील लेहंगा खूप आवडतो. तो पुन्हा परिधान करण्याची संधी कधी मिळेल याचा मी विचार करायचे. सुदैवाने संधी मिळाली. यासाठी मी ‘ॲण्ड टीव्ही’चे आभार मानते. त्यांनी मला विवाह दृश्‍यात माझा विवाह पोशाख परिधान करायला मंजुरी दिली हे आनंददायी आहे. आता प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया मिळते हे पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.’

Web Title: Shubhangi Atre will Bride in serial

टॅग्स