
Shweta Bachchan: लहानपणीच्या 'त्या' घटनेनंच श्वेता बच्चनला सिनेक्षेत्रापासून नेलं दूर..खुलासा करत म्हणालेली..
Shweta Bachchan: बॉलीवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहते. काही दिवस आधी तिला काही फॅशन शोजमध्ये पाहिलं होतं तेव्हा ती ग्लॅमर इंडस्ट्रीत आता सक्रिय होणार अशी चर्चा रंगली होती. पण आपल्या आई-वडीलांप्रमाणे मात्र ती अभिनय क्षेत्रात रुळली नाही हे देखील तितकंच खरं आहे.
खरंतर श्वेता बच्चन जेव्हा छोटी होती तेव्हा ती आपले वडील अमिताभ बच्चन आणि आई जया बच्चन यांच्यासोबत शूटिंगच्या सेटवर जायची.यादरम्यान एकदा सेटवर श्वेताच्या हाताला कुठल्याशा वायरमुळे शॉक लागला होता आणि त्याचा मोठा धसका तिनं घेतला होता. त्यानंतर ती आपल्या पालकांसोबत शूटिंगच्या सेटवर कधीच गेली नाही.(Shweta Bachchan Birthday amitabh jaya bachchan daughter family carrer)
श्वेता आपल्या कॉलेजच्या दिवसांत अभिनय उपक्रमात सहभाग घ्यायची. तिनं थिएटरमध्ये देखील ड्रामामधनं काम केलं आहे.
त्यावेळी एकदा नाटक सुरु असताना श्वेता स्टेजवर आपला शेवटचा सीन पू्र्णपणे विसरली..थोडक्यात ब्लॅंक झाली. आणि तिथनंच अभिनयातील तिचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात झाली. आणि तिनं कायमचं आपल्या मनातून अभिनयाविषयी असलेलं आकर्षण काढून टाकलं.
श्वेता बच्चनं एका मुलाखती दरम्यान या घटनेचा उल्लेख केला होता. तेव्हा ती असं देखील म्हणाली होती की तिनं आपल्या मुलांवर देखील सिनेमात जाण्याचीन जबरदस्ती कधी केली नाही.
तिची मुलगी नाव्या नवेली नंदा ही देखील सिनेमांपासून लांब आहे. पण श्वेताचा मुलगा अगस्त्य नंदानं मात्र ओटीटीवर पदार्पण केलं आहे.
हेही वाचा: ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
श्वेता बच्चनचा जन्म १७ मार्च,१९७४ साली मुंबईत झाला. ती अमिताभ बच्चन यांची मोठी मुलगी असून आईपेक्षा वडीलांप्रती तिला खास जिव्हाळा आहे. ती आपल्या वडीलांच्या तब्येतीची खूप काळजी घेते.
अनेकदा जलसाच्या बाहेर जेव्हा अमिताभ चाहत्यांना भेटायला येतात तेव्हा श्वेताच त्यांच्यासोबत असते. अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या मुलीसाठी खास पोस्ट शेअर करताना दिसतात. आणि तिच्यासोबतच्या गोड आठवणी देखील शेअर करताना दिसतात.