सुशांतची बहीण श्वेताने लीक केले ड्रग ग्रुप चॅट्स, पिठानीने लिहिलंय, 'SSR को डुबी मिल गई ना?'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 29 August 2020

गेल्या काही दिवसांपासून रिया ड्रग चॅट्स खूप चर्चेत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने काही नवीन चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आता शेअर केले आहेत.

मुंबई- सुशांत मृत्यु प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून ड्रग चॅट्स खूप चर्चेत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने काही नवीन चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. या चॅटमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक कोणती तरी डुबी (Doobie) ऑर्डर करण्याबद्दल बोलत आहेत. गुगल सर्चनुसार डुबी म्हणजे गांज्याची सिगारेट असते.  

हे ही वाचा: रियाच्या मुलाखतीनंतर पहिल्यांदाच सुशांतचा मित्र महेश शेट्टीने या प्रकरणात दिली प्रतिक्रिया  

सुशांतची बहीण श्वेताने शेअर केलेले हे चॅट्स २०१९ मधील ३० जुलैचे आहेत. यामध्ये रिया डुबी ऑर्डर करताना दिसतेय. तिने लिहिलंय, 'डुबीची गरज आहे.' यावर एक जण उत्तर देत म्हणतोय 'आणतोय.' तर आयुष नावाची व्यक्ती रिप्लाय देतो  की 'रोल करतोय.' या दरम्यान सिद्धार्थ पिठानी कमेंट करत म्हणतो, 'मिरांडा आला आहे.'

श्वेताने जो स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्या ग्रुपचं नाव NIFW असं दिसतंय. या ग्रुपमध्ये आयुष, आनंदी, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि रियाचं नाव दिसतंय. या चॅटमध्ये अनेकांची ओळख त्यांच्या नावावरुन होत आहे मात्र स्क्रीनशॉटवाला मोबाईल कोणाचा आहे हे अजुन कळू शकलेलं नाही.

 

यात एका चॅटमध्ये सिद्धार्थ पिठानी विचारतोय 'SSR ला डुब मिळाली ना?' तसंच शौविकसोबतच्या मेसेजमध्ये शौविक म्हणतो 'लवकर या आणि येताना आयुषला डुबीज आणायला सांग. सोबत स्पीकर्स देखील घेऊन ये' असं त्याने म्हटलंय.

रिपोर्ट्सनुसार रिया चक्रवर्तीने कबुल केलं आहे की याआधी लीक झालेले ड्रग्स चॅट तिचेच आहेत. यानंतर श्वेताने आता हे नवीन चॅट्स तिच्या ट्विटर अकाऊंटवरर शेअर करत 'हा काय प्रकार सुरु आहे?' आणि 'यातून काय अर्थ काढायचा?' असं म्हटलंय.  

 

shweta leaks whatsapp chat of drug group which include rhea showik siddharth pithani  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shweta leaks whatsapp chat of drug group which include rhea showik siddharth pithani