बिग बींच्या नातीसाठी या अभिनेत्याची खास कमेंट

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने अलीकडेच एक फोटो शेअर केला आणि गहराईयां अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने यावर कमेंट केली.
Siddhant Chaturvedi-Navya Naveli Nanda
Siddhant Chaturvedi-Navya Naveli NandaInstagram

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने अलीकडेच तिच्या Instagram वर स्वत:चे फोटो शेअर केले. नव्याने तिचा आगामी प्रोजेक्ट युनायटेड नेशन्स वुमन इन इंडियासोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले, “#ThatsWhatStreeSaid. लवकरच येत आहे. टचमध्ये रहा.” फोटोमध्ये, नव्याचे स्नॅप व्हिडिओ रेकॉर्डिंगमधील स्निपेट्ससारखे दिसत आहेत. हातात ड्रॉइंग घेऊन पोज देताना नव्या स्माईल करत आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) कमेंट्स सेक्शनमध्ये हार्ट इमोजी टाकला. अलीकडे, गेहराईयां (Gehraiyaan) अभिनेता नव्याला डेट करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. माहितीनुसार दोघेही एका सिरीयस रिलेशनशीपमध्ये आहेत.

Navya Naveli Nanda's Instagram
Navya Naveli Nanda's Instagram

नव्याने फोर्डहॅम युनिव्हर्सिटीमधून तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने यापूर्वी अभिनयात करिअर करू इच्छित नसल्याबद्दल खुलासा केला होता. वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, नव्याने असे म्हटले होते की, "मी कुटुंबाची चौथी पिढी नेतृत्व करणारी-आणि पहिली महिला असेन. माझे पणजोबा एच.पी. नंदा (H.P. Nanda) यांचा हा अतुलनीय वारसा पुढे नेत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." 2020 मध्ये नव्याने 'आरा हेल्थ' लाँच केले आणि त्याच्याशीही अजून संबंधित आहे. तिने लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोजेक्ट 'नवेली' हे एनजीओही (NGO) सुरू केले.

Siddhant Chaturvedi-Navya Naveli Nanda
अजून तर लग्न व्हायचंय, त्यापूर्वीच शिबानीची पोस्ट

2019 मध्ये, सिद्धांत म्हणाला होता की तो कोणाशीतरी सिरीयस रिलेशनशीपमध्ये होता आणि म्हणाला की दोघांनी मित्र म्हणून सुरुवात केली. मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, ती इंडस्ट्रीशी जोडलेली आहे पण अभिनेत्री नाही. बरं, जर नव्या आणि सिद्धांतच्या डेटिंगच्या बातम्या खऱ्या वाटत असतील, तर ते बी-टाउनमधील नवीन जोडपे असेल.

11 फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडीओवर सिद्धांतचा चित्रपट गहराईयां रिलीज झाला. या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धांत पुढे कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि ईशान खट्टरसोबत (Ishaan Khattar) फोन भूतमध्ये (Phone Bhoot) दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com