
Siddharth Jadhav: अशोकमामा म्हणजे द्रोणाचार्य, त्यांची मूर्ती मनात बसवून.. सिद्धार्थ जाधव झाला प्रचंड भावुक
Ashok Saraf News: यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा (Zee Chitra Gaurav 2023) हा खूप अविस्मरणीय झाला. अंकुश चौधरी पासून ते सचिन पिळगावकर अशा अनेक लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता आले.
या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवनगौरव पुरस्कार’, यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे अभिनय सम्राट 'अशोक सराफ'.
(siddharth jadhav emotional post on ashok saraf after he got zee chitra gaurav jivangaurav puraskar 2023)
हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
सिद्धार्थ जाधवने अशोक सराफ यांच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स करून नृत्याच्या माध्यमातून अशोक सराफ यांची जीवनकहाणी उलगडली.
सिद्धार्थ जाधवचा डान्स जेव्हा संपला तेव्हा तो स्टेजवरून खाली आला आणि धावत अशोक मामांच्या पायाशी नतमस्तक झाला.
अशोकमामा सुद्धा या गोष्टीमुळे भावुक झाले. सिद्धार्थने नुकतीच एक पोस्ट लिहून मामांविषयी आदर व्यक्त केलाय.
सिद्धार्थने अशोक मामांच्या पायाशी बसलेला फोटो शेयर करत कॅप्शन लिहिलंय कि.. अशोक सराफ... अशोक मामा...
माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य.... त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते .
सिद्धू पुढे लिहितो, पण आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली ... आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली.. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं.. आशिर्वाद दिले...
मामांना जीवन गौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स करून माझ्या जिवनाचं सार्थक झालं.... हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षांत राहील .... अशी पोस्ट सिद्धार्थने लिहून मामांविषयी प्रेम आणि आदर व्यक्त केलाय.
अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’! खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा.
पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. अशोक सराफ अलीकडेच रितेश देशमुख - जिनिलियाच्या वेड सिनेमात अभिनय केला.