बॉलीवूड भूमी'त सिद्धांत 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

छोट्या पडद्यावरील "टशन-ए-इश्‍क' मालिकेत अभिनेता सिद्धांत गुप्ताने साकारलेल्या कुंज सरनाच्या भूमिकेचं सगळीकडे खूप कौतुक झालं. त्याने मालिकेत साकारलेला पंजाबी मुंडा खूपच भाव खाऊन गेला. 

छोट्या पडद्यावरील "टशन-ए-इश्‍क' मालिकेत अभिनेता सिद्धांत गुप्ताने साकारलेल्या कुंज सरनाच्या भूमिकेचं सगळीकडे खूप कौतुक झालं. त्याने मालिकेत साकारलेला पंजाबी मुंडा खूपच भाव खाऊन गेला. 
तसंच त्याने "झलक दिखला जा'च्या नवव्या सीझनमध्ये भाग घेतला होता. आता तो बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झालाय. ओमंग कुमार दिग्दर्शित "भूमी' चित्रपटात तो दिसणार आहे. ओमंग कुमार यांनी ट्‌विटरवर माहिती दिली की, "सिद्धांत गुप्ता "भूमी' चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत मुख्य भूमिकेत असणारेय ' याविषयी सिद्धांत सांगतो की, "मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे खूप छान वाटतंय. या सिनेमात एका छोट्या शहरातील मुलाचा रोल करतोय.' या चित्रपटाद्वारे अभिनेता संजय दत्त रुपेरी पडद्यावर कमबॅक करतोय. या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारलेली आहे.  

Web Title: sidhant gupta tashan E ishka bollywood